25 January 2020

News Flash

‘सदा सौभाग्यवती भव:’ : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वात टॉपचे सेलिब्रेटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी (दि.१४) लग्नबंधनात अडकले. मात्र, मोठ्या थाटात लग्न सोहळा होऊनही त्यांच्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा लग्नातील फोटो

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वात टॉपचे सेलिब्रेटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी (दि.१४) लग्नबंधनात अडकले. मात्र, मोठ्या थाटात लग्न सोहळा होऊनही त्यांच्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. अखेर गुरुवारी २४ तासांनंतर स्वतः दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो प्रसिद्ध केले. दरम्यान, युजर्सने या जोडप्याला अनेक शुभेच्छा दिल्या. तर काहींनी दीपिकाच्या साडीवरुन चर्चा चालवली.

दीपिकाने लग्नाच्यावेळी घातलेल्या लाल रंगाच्या साडीवर तिच्या चाहत्या असलेल्या काही तरुणींची खास नजर होती. दीपिकाच्या या शाही पेहरावावर तिने डोक्यावरुन घेतलेला दुपट्टा हा विशेष दुपट्टा असल्याचे या चाहत्यांचे म्हणणे आहे. कारण या दुपट्ट्यावर एक सुभाषित प्रिंट करण्यात आले आहे. ते म्हणजे, ‘सदा सौभाग्यवती भव:’. ही टॉगलाईन आपल्याला खूपच आवडल्याचे एका तरुणीने दीपिकाच्या फोटोवर कमेंट करताना म्हटले आहे.

तुझ्या दुपट्ट्यावरील सुभाषित आणि तुझे लाखात एक हास्य या गोष्टी खूपच छान दिसत आहेत असे दुसऱ्या एका तरुणीने म्हटले आहे. तर आणखी एका तरुणीने रणवीरच्या कपड्यांवर कमेंट करताना तो गळ्यात नेकलेस का घालत आहे? असा प्रश्न केला आहे.

एकूणच बॉलिवूड कलाकारांची सर्वसामान्य लोकांमध्ये किती मोठी क्रेझ असते हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या सेलिब्रेटींच्या बारीक सारिक बाबींवर त्यांचे चाहते चर्चा करत असतात, त्यांच्या स्टाईल फॉलो करतात. दीपिका-रणवीरचे लग्नाचे फोटोज तत्काळ पहायला मिळावेत यासाठी त्यांचे चाहते भलतेच रोमांचित झाले होते.

First Published on November 16, 2018 2:06 am

Web Title: sada saubhagyavati bhav discussion on social media from deepikas wedding saree
Next Stories
1 चाहत्यांची प्रतीक्षा संपली; दीप-वीरनं अखेर शेअर केले लग्नाचे खास फोटो
2 शाहरुखने घेतली आमिरची बाजू, ‘ठग्स ऑफ…’च्या अपयशाबद्दल म्हणाला…
3 लग्नाआधी मी ७५ मुलींना डेट केलंय- अंगद
Just Now!
X