20 October 2019

News Flash

दिवंगत सदाशिव अमरापूरकरांचा वारसा जपण्यासाठी लेकी सज्ज, ‘पुरुषोत्तम’ चित्रपटातून करणार कलाविश्वात पदार्पण

या चित्रपटाच्या निमित्ताने अमरापूरकर मायलेकी करणार एकत्र काम

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच मराठी रंगभूमीवर दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला. आता त्यांच्या याच अभिनयाचा वारसा त्यांच्या कन्या पुढे चालविणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांची धाकटी लेक लवकरच एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. तर थोरली लेक या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला ‘पुरूषोत्तम’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रिमा अमरापूरकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले असून, ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने अमरापूरकर मायलेकी एकत्र काम करणार आहेत.

समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिका-याची गोष्ट सांगणा-या या सिनेमाची निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली असून नुकतंच सोशल नेटवर्किंग साइटवर चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

दरम्यान, केतकी अमरापूरकरसह नंदु माधव हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्याचप्रमाणे भूमिका असून, किशोर कदम, देविका दफ्तरदारआणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या १० मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

First Published on April 22, 2019 5:28 pm

Web Title: sadashiv amrapurkar daughter direct new marathi movie