07 March 2021

News Flash

‘डब्बा ऐसपैस’ चित्रपटात सदाशिव अमरापूरकर दिसणार

मराठी नाटक आणि चित्रपटासह हिंदी चित्रपटसृष्टीतही शब्दशैली, संवादफेक आणि अभिनयाचा आपला स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविलेले कसदार अभिनेते म्हणून दिवंगत सदाशिव अमरापूरकर यांची ओळख आहे. ‘

| January 22, 2015 01:22 am

मराठी नाटक आणि चित्रपटासह हिंदी चित्रपटसृष्टीतही शब्दशैली, संवादफेक आणि अभिनयाचा आपला स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविलेले कसदार अभिनेते म्हणून दिवंगत सदाशिव अमरापूरकर यांची ओळख आहे. ‘डब्बा ऐसपैस’ या आगामी मराठी चित्रपटात ते दिसणार असून त्यांनी अभिनय केलेला हा शेवटचा चित्रपट आहे. खेडेगावातील मराठी शाळा, त्यांचे प्रश्न आणि या शाळांना करावा लागणारा संघर्ष या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. मराठी शाळा आणि त्यांचे भवितव्य हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. इंग्रजी शाळांच्या अतिक्रमणामुळे मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. बंद पडणारी/पाडण्यात येणारी मराठी शाळा वाचविण्यासाठीचा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. चित्रपटात अमरापूरकर यांच्यासह यतीन कार्येकर, गणेश यादव, कश्मिरा कुलकर्णी हे कलाकार आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 1:22 am

Web Title: sadashiv amrapurkar last movies dabba aise paise to release
Next Stories
1 ‘कस्तुरबा’ इंग्रजीत बोलणार!
2 ‘दिवार’ची चाळीशी!
3 प्रियांकाचा वेस्टर्न लूक
Just Now!
X