News Flash

‘सहनशक्ती संपली…बांध फुटला…आता काय कराल?’; सागर कारंडेने पोस्ट केला मुलीचा व्हिडीओ

वैतागलेल्या मुलीचा व्हिडीओ 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

‘सहनशक्ती संपली…बांध फुटला…आता काय कराल?’; सागर कारंडेने पोस्ट केला मुलीचा व्हिडीओ

करोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने अजूनही काही शहरांत लॉकडाउन आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ लोक आपापल्या घरात बंदिस्त आहेत. ऑनलाइन शिक्षण जरी सुरू झालं असलं तरी लहान मुलांना घराबाहेर पडता येत नाहीये. त्यामुळे वैतागलेल्या मुलीचा व्हिडीओ ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडेनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘सहा महिने कोण घरात बसणार?’ असं म्हणत ही चिमुकली रडताना या व्हिडीओत दिसतेय.

सहनशक्ती संपली…बांध फुटला…आता काय कराल?, असं कॅप्शन सागरने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओत त्याच्या मुलीने बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘तंदुरी, क्रिस्पी, चिकन टिक्का, चिकन लॉलीपॉप खायचंय’, असं ती म्हणते. त्यावर सागर तिला समजावतो की, ‘सगळं सुरू झाल्यावर जाऊ.’ त्यावर चिडून ती मुलगी विचारते, ‘तीन-चार महिने थांबली ना. अजून किती थांबायचं? हा करोना कधी जाणार? मी सहा महिने अजून नाही थांबणार’, असा हट्ट ती करते.

 

View this post on Instagram

 

#covid19 #homequarantine #helplessgirl #stayhome #staysafe

A post shared by Saagar Karande (@saagarkarande) on

करोना व्हायरसचा धोका कधी टळणार आणि दिलासा कधी मिळणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. इतके दिवस घरी थांबायची सवय नसल्याने अनेकजण कंटाळले आहेत. संयमाची परीक्षा घेणारा हा काळ आहे. हा व्हायरस अजून पसरू नये यासाठी नागरिकांनी लॉकडाउनचं पालन केलं पाहिजे, असं आवाहन सरकारकडून आणि सेलिब्रिटींकडूनही करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 1:48 pm

Web Title: sagar karande shared a cute video of his daughter who is asking for outside food ssv 92
Next Stories
1 सुशांत सिंगचा अपूर्ण राहिलेला ‘तो’ चित्रपट मित्र करणार पूर्ण, शेअर केलं पोस्टर
2 शाहरुखने आमिर खानला काजोल सोबत काम न करण्याचा दिला होता सल्ला
3 “नव्या कलाकारांसोबत होतोय अन्याय”; बॉलिवूडमधील घराणेशाहीवर संतापला अदनान सामी
Just Now!
X