24 November 2017

News Flash

Sagarika Ghatge: झहीरच्या नव्या लूकच्या गुगलीवर सागरिका क्लिन बोल्ड!

या अनोळखी व्यक्तीसोबत मी घरी परतलेय

मुंबई | Updated: May 19, 2017 3:00 PM

भारताचा माजी जलद गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने त्यांच्या साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर तो सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला.

क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये असलेली प्रेमप्रकरण आता काही नवीन राहिलेली नाहीत. काही दिवसांपूर्वीच सर्वांसमोर असेच एक नवे नाते उलगडले गेले. भारताचा माजी जलद गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने Sagarika Ghatge त्यांच्या साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर तो सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला. इंडियन प्रिमियर लीगच्या दहाव्या सिझनदरम्यानच या प्रेमीयुगुलाने त्यांचे हे गुपित सर्वांसमोर आणले होते.

सागरिकाने सोशल मीडियावर नुकताच झहीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यास तिने रंजक कॅप्शनही दिलेय. ‘या अनोळखी व्यक्तीसोबत मी घरी परतलेय.’ या कॅप्शमध्ये तिने झहीरला मेन्शन केले असून, त्यास ‘ब्रेक द बिअर्ड’ ( #breakthebeard ) हा हॅशटॅगही दिला आहे. झहीरचा क्लिन शेव्ह केलेला लूक यात पाहावयास मिळतो. त्याच्या या नव्या लूकने सागरिका भलतीच खूश झालेली दिसतेय.

‘कधीच आपल्या जोडीदाराच्या आवडींवर हसू नये. तुम्हीसुद्धा त्यापैकीच एक असता’, असे पोस्ट करत झहीरने सागरिका त्याची आता आयुष्यभराची जोडीदार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्याचवेळी सागरिकानेही साखरपुड्याची अंगठी दाखवत ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांना दिली.

‘आयपीएल २०१७’मध्ये झहीर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे नेतृत्व करत होता. पण, या संघाला अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आल्याने त्यांना परतीची वाट पकडावी लागली. दिल्ली डेअरडेव्हिल्स १२ गुणसंख्येसह सहाव्या स्थानी होता. त्याचा आधीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरोधात दिल्ली डेअरडेव्हिल्सने शेवटचा सामना खेळला. यात विराटच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने १० धावांनी दिल्ली डेअरडेविल्सचा पराभव केला.

First Published on May 19, 2017 11:21 am

Web Title: sagarika ghatge impressed with zaheer khans new look