28 May 2020

News Flash

सागारिकाची ‘तेव्हाची कविता कोरी’

मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक गायकांना उत्तम संधी

| December 30, 2014 01:54 am

मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक गायकांना उत्तम संधी देऊन त्यांचे करिअर घडविण्यात मोलाची साथ दिली आहे. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न सागरिका म्युझिक करत असते आणि त्यांच्या या अथक प्रयत्नांना उत्तम  यशही प्राप्त झाले आहे.    
नेहमीच काही तरी वेगळे करण्यात व्यग्र असलेल्या सागरिकाचे लक्ष गेले ते प्रियंका बर्वे या नव्या गायिकेकडे. ‘प्रेमाला’ या हिट गाण्यानंतर सागरिकाने प्रियांका बर्वे साठी आणखी एक गाणं करायच ठरवल. वैभव जोशींनी लिहिलेलं ‘तुझ्यासवे तुझ्याविना’ हे गाण करायचं शेवटी ठरवलं.यावेळी मात्र सागरिकाला संगीतकार ही नवीन हवे होते. तेव्हा प्रियांकाने तिच्या ग्रुपमधील जसराज जोशी, हृषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांच नाव सुचविल. त्यांनी याआधी रेकॉर्ड केलेल ‘तेव्हाची कविता कोरी’ हे गाणं प्रियांकाने सागरिकाला ऐकायला दिलं. सागरिकाला हे गाणं इतकं आवडलं की तिने प्रियंकाच्या नव्या गाण्यासाठी ह्या बॅण्डला निश्चित तर केलंच त्याचप्रमाणे ”सागरिका म्युझिक च्या १६ व्या Anniversary कॉन्सर्टमध्ये हे गाणं पुन्हा नव्याने रिलीज करण्याचे ठरविले. सागरिकाने तर या बॅण्डला त्यांच्या आद्याक्षरावरून JSH असे नावही दिले.
”तेव्हाची कविता कोरी” हा व्हिडीओ सागरिकाने बनविण्याचे ठरविले ते केवळ या गाण्यातील वेगळेपणामुळे. उत्तम शब्द, JSH ने दिलेली सुमधुर चाल  यासर्व गोष्टींमुळे ह्या व्हिडीओला चार चाँद लागले आहेत. ह्या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं जसराज जोशी, सौरभ भालेराव आणि ऋषिकेश दातार ह्या तिघांवर चित्रित करण्यात आले आहे. एका जमता-जमता राहून गेलेल्या या कवितेचे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले असून या व्हिडीओची संकल्पना आणि दिग्दर्शन सागरिका दास यांचे आहे.
हे गाणं आम्ही दोन वर्षापूर्वी करून ठेवले होते. कवितेचे शब्द आम्हाला आवडले होते त्यामुळे आम्ही त्याचे गाण्यात रुपांतर केले होते. साधारणतः एक दीड वर्षापूर्वी हे गाणं रिलीजही झाले होते. जेव्हा सागरिकाने हे गाणं पुन्हा रिलीज करून या गाण्याचा व्हिडीओ बनविण्याचे ठरविले त्यावेळी तो आमच्यासाठी खरच एक सुखद धक्का होता. आमच्याच गाण्याचा व्हीडीओ आमच्यावरच चित्रित होणार होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्षात हे गाणं आमच्याकडे येण्याची आणि आणि ते गाणं बनण्याची प्रोसेस होती तिच या व्हिडीओमध्ये चित्रित करण्यात आल्याची प्रतिक्रिया JSH बॅण्डने व्यक्त केली.
सध्या सोशल नेट्वर्किंग साईट्सवर ‘तेव्हाची कविता कोरी…; ह्या गाण्याच्या व्हिडीओला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2014 1:54 am

Web Title: sagrikas tevachi ti kavita kori get good response
टॅग Marathi Movie
Next Stories
1 आमिरच्या ‘पीके’ची शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’वर मात !
2 निर्माता म्हणून निर्णय घेण्याचा आनंद उपभोगतेय- प्रियांका
3 उर्मिला कोठारेची ‘नृत्यआशा’ अकादमी
Just Now!
X