बॉलिवूड अभिनेता साहिल खानने ‘स्टाइल’ या २००१मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याने त्याच्या स्टाइल, लूक आणि अभिनयाने अनेकांच्या मनावर जादू केली होती. त्याच्या पहिल्याच चित्रपटातून त्याने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. पण त्यानंतर अचानक साहिल बॉलिवूड इंडस्ट्रीपासून लांब गेला. आता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर साहिलने एक पोस्ट शेअर बॉलिवूड सोडण्यामागचे कारण सांगितले आहे.

साहिलने एका जुन्या मॅग्झीनचा फोटो शेअर करत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. ‘खूप कमी लोकांनासोबत आयुष्यात असे होते की आपल्या पहिल्याच चित्रपटातील स्टाइलनंतर इंडियाच्या टॉप फिल्म मॅग्झीनच्या कवर फोटोवर, भारतातील दोन मोठ्या सुपरस्टारसोबत झळकण्याची संधी मिळते. पण त्यांच्यामधील एका सुपस्टारला या गोष्टीचा राग आला. कारण मी नवीन होतो आणि त्यांचा चाहता होतो. त्यांनी अनेकवेळा मला साइड रोलसाठी बोलावले होते, टीव्ही शोसाठी देखील बोलावले. त्यानंतर मला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आले’ असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

View this post on Instagram

BOHUT KAM LOGON KE SAATH ZINDAGI MAIN AESA HOTA HAI KE APNI 1st FILM #STYLE KE BAD INDIA KE SABSE TOP FILM MAGAZINE KE COVER PAR, DO INDIA KE SAB SE BADE SUPER STAR KE SAATH HO…. MAGAR UNME SE EK SUPER STAR KO BOHUT BURA LAGA JAB KE MAIN TO NAYA THA, UNKA FAN THA, KAMZOR THA PHIR BHI WOH MUJHE KAI BAAR SIDE ROLE KE LIYE BULATE RAHE, TV SHOW KE LIYE BHI BULATE RAHE – AUR PHIR KAI FILMS SE MUJHE NIKALWA DIYA NAAM BADE AUR DARSHAN CHOTE GUESS WHO ??? I DONT GIVE A FUCK TODAY FOR HIM COZ @sushantsinghrajput NE UNKA SUCHHA ASLI CHEHRA DIKHA DIYA. DUNIYA KE WOH LOG NEW TALENTS SE KITNA DARTE HAI – 20 SAAL MAIN JOHN ABRAHAM KE ILAWA KOI NAHI AYA INDUSTRY MAIN BADA STAR COZ KOI ANE HI NAHI DETA; ONLY STAR SON KO HI KAAM MILTA HAI – THINK ABOUT IT – RIP @sushantsinghrajput . . #IfYouDontKnowNowYouKnow #SahilKhan #Hunk #hunkwater #bollywood #history #OneLife #Mumbai #FitnessIC⭕N #KaamKaroNaamKaro #OneLifeBaby

A post shared by India’s Fitness & Youth IC⭕N (@sahilkhan) on

सुशांत सिंह राजपूतने देखील त्यांचे खरे चेहरे पाहिले असणार. हे लोक नवीन टॅलेंटला किती घाबरतात. २० वर्षांत जॉन अब्राहम व्यतिरिक्त कोणीही मोठा स्टार इंडस्ट्रीमध्ये आलेला नाही कारण कोणी येऊच देत नाही. फक्त स्टार्सच्या मुलांनाच घेतले जाते. विचार करा या गोष्टीचा असे त्याने पुढे म्हटले आहे. तसेच त्यांने पोस्टमध्ये सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे.

साहिलने या पोस्टसोबतच एक व्हिडीओ पण पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने त्याच्या संपूर्ण करिअर विषयी सांगितले आहे. तसेच बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा देखील त्याचा निर्णय असल्याचे त्याने सांगितले. सध्या तो त्याच्या आयुष्यात आनंदी असल्याचे त्याने म्हटले आहे.