सुशांत सिह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घराणेशाहीसाठी अभिनेता सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडियाद्वारे तुफान टोलेबाजी होत आहे. दरम्यान अभिनेता साहिल खान याने देखील बॉलिवूडची पोल खोल केली. लक्षवेधी बाब म्हणजे त्याने एक फोटो शेअर करुन सलमान आणि शाहरुख खानवर उपरोधिक टोला लगावला आहे.

साहिलने इन्स्टाग्रामवर स्टारडस मॅगझिनचे कव्हर पेज पोस्ट केले आहे. हे पेज २००२ चे आहे. या पेजवर साहिलसोबत सलमान आणि शाहरुख खान दिसत आहेत. पहिल्याच चित्रपटानंतर साहिलचा फोटो एका नामांकित मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणं एका खानला आवडलं नव्हतं. त्यामुळे त्याने माझे करिअर संपवलं. असा धक्कादायक आरोप साहिलने केला आहे.

 

View this post on Instagram

 

BOHUT KAM LOGON KE SAATH ZINDAGI MAIN AESA HOTA HAI KE APNI 1st FILM #STYLE KE BAD INDIA KE SABSE TOP FILM MAGAZINE KE COVER PAR, DO INDIA KE SAB SE BADE SUPER STAR KE SAATH HO…. MAGAR UNME SE EK SUPER STAR KO BOHUT BURA LAGA JAB KE MAIN TO NAYA THA, UNKA FAN THA, KAMZOR THA PHIR BHI WOH MUJHE KAI BAAR SIDE ROLE KE LIYE BULATE RAHE, TV SHOW KE LIYE BHI BULATE RAHE – AUR PHIR KAI FILMS SE MUJHE NIKALWA DIYA NAAM BADE AUR DARSHAN CHOTE GUESS WHO ??? I DONT GIVE A FUCK TODAY FOR HIM COZ @sushantsinghrajput NE UNKA SUCHHA ASLI CHEHRA DIKHA DIYA. DUNIYA KE WOH LOG NEW TALENTS SE KITNA DARTE HAI – 20 SAAL MAIN JOHN ABRAHAM KE ILAWA KOI NAHI AYA INDUSTRY MAIN BADA STAR COZ KOI ANE HI NAHI DETA; ONLY STAR SON KO HI KAAM MILTA HAI – THINK ABOUT IT – RIP @sushantsinghrajput . . #IfYouDontKnowNowYouKnow #SahilKhan #Hunk #hunkwater #bollywood #history #OneLife #Mumbai # #KaamKaroNaamKaro #OneLifeBaby

A post shared by India’s Fitness & Youth (@sahilkhan) on

“फारच कमी लोकांना पहिल्याच चित्रपटानंतर लोकप्रियता मिळते. मला ती मिळाली. स्टाईल चित्रपट सुपरहिट झाला. मला स्टारडससारख्या नामांकित मॅगझिनवर झळकण्याची संधी मिळाली. ते देखील शाहरुख आणि सलमानसोबत. मी त्यांच्या फॅन होतो. त्यांना आपला आदर्श मानायचो. परंतु त्यांच्यापैकी एका खानने माझं करिअर संपवलं. मला चित्रपटांमधून बाहेर काढलं. यांची नावं मोठी पण दर्शन मात्र छोटेच आहेत.” अशा आशयाची पोस्ट साहिलने लिहिली आहे. साहिलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलिकडेच करण जौहर व सलमान खान विरोधात एक ऑनलाईन पिटिशन जारी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यावर दोन दिवसांत तब्बल २९ लाख लोकांनी सह्या केल्या. यावरुन लोकांच्या मनातील सलमान विरोधातील राग दिसून येत आहे.