दादर-माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी साहित्य रंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात रहस्य, भय, गूढ साहित्यावर चर्चा आणि कार्यक्रम होईल.
२२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता लेखक निरंजन घाटे यांचे ‘मराठी भय, रहस्य, गूढ साहित्याचे स्वरूप’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांच्या कथांचे अभिवाचन केले जाणार आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाबुराव अर्नाळकर, सुहास शिरवळकर, भानू शिरधनकर,मधुकर अर्नाळकर यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम विलास कुवळेकर सादर करतील. तर सायंकाळी सात वाजता ‘भय इथले संपत नाही’ या कार्यक्रमात कमलेश भडकमकर आणि सहकारी मराठीतील रहस्यमय, गूढ चित्रपटातील काही गाणी सादर करणार आहेत.