21 January 2021

News Flash

पहिल्या पर्वातील सई लोकुरची बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री

'अतिथी देवो भव:' या टास्कसाठी पहिल्या पर्वामधील सदस्य पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांना गेस्ट म्हणून बोलवण्यात आले आहेत

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. घरामध्ये नवनवीन टास्क रंगायला सुरुवात झाली आहे. एकाहून एक नवनवीन टास्क सुरु असतानाच ‘अतिथी देवो भव:’ हे साप्ताहिक कार्य बिग बॉसकडून स्पर्धकांना देण्यात आले आहे. या टास्क दरम्यान घरात काही गेस्ट येतात आणि या गेस्टमधील सई लोकुर दुसरा वाइल्ड कार्ड स्पर्धक असल्याचे बिग बॉस घोषीत करतात.

‘अतिथी देवो भव:’ या टास्कसाठी पहिल्या पर्वामधील सदस्य पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांना गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. हे गेस्ट सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहेत. घरातील सदस्य दिलेले टास्क चतुराईने कसे पूर्ण करतील आणि स्टार मिळवतील हे आज कळणार आहे. दरम्यान बिग बॉस सई लोकुरला बिग बॉस मराठी सिझन २ ची दुसरी वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घोषीत करतात. हे ऐकून घरातील इतर सदस्य आणि सई खूप खुश असल्याचे दिसत आहे.

दरम्यान पुष्कर साखर, चहा पावडर आणि मिठाची बिरणी लपवताना दिसत आहे. आता अचानक या बरण्या कुठे गेल्या असा प्रश्न सदस्यांना पडणं अगदीच सहाजिक आहे. घरातील सदस्य ऐकमेकांच्या टीमला दोषी ठरवणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. तसेच त्यांना कळाल्यावर ते कशा बरण्या परत मिळवणार असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 4:44 pm

Web Title: sai lokur is second wild card entry in bigg boss avb 95
Next Stories
1 स्वरा भास्करचे ब्रेकअप; पाच वर्षांपासून या व्यक्तीला करत होती डेट
2 तापसी पन्नूला ‘सस्ती कॉपी’ म्हणणाऱ्या रंगोलीला अनुराग कश्यपने झापले
3 बॉयफ्रेंडच्या अचानक मृत्यूनंतर संजय दत्तच्या मुलीची भावनिक पोस्ट
Just Now!
X