21 November 2019

News Flash

आता सई ठेवणार बिग बॉसच्या घरावर लक्ष ?

सई घराच्या बाहेर राहून घरातल्या रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठी सध्याच्या घडीला चांगलाच चर्चेला जात आहे. पहिल्या पर्वाप्रमाणेच यंदाचं पर्वदेखील तितकंच गाजताना दिसत आहे. पहिल्या पर्वामध्ये मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे हे स्पर्धक चांगलेच चर्चेत आले होते. विशेष म्हणजे पहिल्या पर्वातील अभिनेत्री सई लोकूर आता पुन्हा एकदा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डोकावत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घरात न जातदेखील ती या घरातीलच एक भाग असल्याचं पाहायला मिळणार आहे.

सई घराच्या बाहेर राहून घरातल्या रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. त्यासोबतच ती या घडामोडींवर भाष्य करणार आहे. ‘एक घर बारा भानगडी’ असं सईच्या आगामी शोचं नाव असून यामध्ये ती बिग बॉसच्या घरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तिचं मत व्यक्त करणार आहे.

माझ्या शोविषयी चाहत्यांना माहिती मिळाल्यापासून ते अनेक वेळा मला विविध प्रश्न विचारत आहेत. त्यांनादेखील या शोविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी मला मेसेज करुन मी बिग बॉस बघते का ?, यंदाच्या पर्वातील स्पर्धकांविषयी मला काय वाटतं, असे अनेक प्रश्न विचारले आहेत, असं सई म्हणाली.

‘एक घर बारा भानगडी’ या शोमध्ये सई यंदाच्या स्पर्धकांविषयी तिचं मत परखडपणे मांडणार आहे. त्यामुळे ती अप्रत्यक्षपणे बिग बॉसशी जोडली जाणार आहे. बिग बॉसच्या घरात बिग बॉसचा आवाज ऐकू येत असे. त्याप्रमाणेच सईच्या शोमध्ये बिग मावशीचा आवाज घुमणार आहे.

मराठी बॉक्स ऑफिसवर येणा-या या शोमधून सई सोबतच तिचा बिग बॉसच्या घरात दिसलेला लाडका मित्र पुष्कर जोगही दिसणार आहे. त्यामुळे आता जशी बिगबॉसच्या घरात या दोघांची आंबट-गोड मैत्री पाहायला मिळाली. तशीच नोक-झोक या शोमध्येही पाहायला मिळेल का, हे औत्सुक्याचे ठरेल.

First Published on June 12, 2019 6:27 pm

Web Title: sai lokur new show ek ghar bara bhangadi bigg boss marathi 2 ssj 93
Just Now!
X