25 November 2020

News Flash

…म्हणून ‘राऊडी बेबी’च्या यशानंतर साई पल्लवीचे चाहते झाले नाराज

वाचा, नेमकं काय आहे कारण...

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा ‘मारी २’ हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. सध्या हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात धनुष आणि साई पल्लवी ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली असून सध्या या चित्रपटाती राऊडी बेबी हे गाणं चांगलंच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गाण्याने अलिकडेच १०० कोटी व्ह्युजचा टप्पा गाठला आहे.

सध्या युट्युबवर धनुष व साई पल्लवी यांचं राऊडी बेबी हे गाणं सुपहिट ठरत असून या गाणे १०० कोटींचा टप्पा गाठल्यामुळे एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये या गाण्याशी संबंधित एक पोस्ट प्रदर्शित करण्यात आलं. मात्र त्या पोस्टरमध्ये केवळ धनुष एकटाच झळकला आहे. त्यामुळे साई पल्लवीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या गाण्यात धनुषसोबत साई पल्लवीदेखील झळकली आहे. त्यामुळे पोस्टरमध्ये तिचादेखील फोटो असणं गरजेचं होतं असं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे.

जर या गाण्यात साई पल्लवी नसती तर हे गाणं सुपरहिट झालंच नसतं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर हे अत्यंत चुकीचं आहे साई पल्लवीशिवाय हे पोस्टर करणं योग्य नव्हतं. दरम्यान, १०० कोटी व्ह्युजचा टप्पा गाठणारं हे पहिलं दाक्षिणात्य गाणं ठरलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 3:23 pm

Web Title: sai pallavis fans are outraged as makers sideline her in rowdy babys success poster dcp98 2
Next Stories
1 अक्षय कुमारच्या ५०० कोटींच्या दाव्यावर यूट्यूबर राशिदने दिली प्रतिक्रिया; म्हणाला…
2 ११ डिसेंबरला थिएटरमध्ये धडकणार ‘इंदू की जवानी’?
3 ड्रग्ज प्रकरणात भारती सिंहचं नाव आलं समोर; NCBने बजावले समन्स
Just Now!
X