24 November 2020

News Flash

..अन् सई-अमृता आल्या एकत्र!

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्यातील तगड्या स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

अमृता खानविलकर, सई ताम्हणकर

अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्यातील तगड्या स्पर्धेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मग त्यांचे अगदी ‘फिट’ राहणं असो किंवा रेड कार्पेट वर एकसे बढकर एक स्टाईल स्टेटमेंट करणं असो. दोघीही सध्या एकमेकींवर कुरघोडी करताना दिसत आहेत. परंतु या दोघी नुकत्याच एका कार्यक्रमात चक्क एकत्र गेल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी नुकतीच एका बॉलिवूड फॅशन ब्लॉगरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती लावली.

वाचा : शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात रचला इतिहास

सर्वच बॉलिवूड कलाकार आणि चित्रपटांच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘मिस मालिनी’च्या पुस्तक अनावरण सोहळ्यात मराठीतील या दोन हॉट अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. मिस मालिनी बॉलिवूड विश्वातली एक नावाजलेली फॅशन ब्लॉगर आहे. अगदी शाहरुख खान, अक्षय कुमारपासून विद्या बालन, इरफान खान सर्वच बॉलिवूड सेलिब्रिटी मिस मालिनीच्या मुलाखतीमध्ये, सोशल मीडियावर विशेष उपस्थिती लावतात. प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आवर्जून ‘मिस मालिनी’ ची भेट घेतात. अशा या मिस मालिनीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मराठीतील दोन्ही ग्लॅमरस दीवांना विशेष आमंत्रण देण्यात आलं होतं.

वाचा : ‘नमस्कार, मी बिग बॉस बोलतोय..’

सई आणि अमृता दोघीही मिस मालिनीच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उपस्थित होत्या आणि त्यांनी कॅमेऱ्यासाठी एकत्र पोजही दिली. शिवाय या दोघीचा लूक मिस मालिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चर्चेचा विषय ठरला. बॉलिवूडच्या मांदियाळीत सई आणि अमृता या दोन मराठी अभिनेत्रीनी लावलेली ही उपस्थिती लक्षवेधी आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 3:10 pm

Web Title: sai tamhankar and amruta khanvilkar come together for miss malini book launch
Next Stories
1 VIDEO : अक्षय, सलमानची ‘ढिंच्याक’ सवारी
2 अखेर ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’साठी प्रभू आला धावून
3 आक्षेपार्ह टिप्पणीमुळे सलमान खान, शिल्पा शेट्टीला समन्स
Just Now!
X