26 September 2020

News Flash

‘नाद करा’ गाण्यावरचा सई आणि सोनालीचा हा व्हिडीओ पाहिलात?

सई आणि सोनाली या दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे

धुरळा हा सिनेमा ३ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. अंकुश चौधरी, उमेश कामत, अमेय वाघ, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अलका कुबल, सिद्धार्थ जाधव आणि प्रसाद ओक अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातलं नाद करा पण आमचा कुठं? हे गाणं शनिवारी रिलिज झालं. या गाण्याला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. याच गाण्यावर सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनीही ठेका धरत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओलाही सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

नाच करा, पण असा कुठं! असं टायटल या व्हिडीओला देण्यात आलं आहे. सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनीही हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टा पेजवर शेअर केला आहे. त्यांच्या या खास व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. धुरळा सिनेमाची टीम सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अनेक दिवसांनी एक राजकीयपट मराठीत येतो आहे त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमाच्या ट्रेलरलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सई आणि सोनालीच्या या नाचाचीही चर्चा आहे. या व्हिडीओला काही तासांमध्येच असंख्य लाईक्स मिळाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 4:19 pm

Web Title: sai tamhankar and sonalee kulkarnis special video on instagram scj 81
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांची पुरस्कार सोहळ्याला गैरहजेरी; सरकारनं जाहीर केली नवी तारीख
2 Video: फोटोग्राफरचा फोन हातात घेत दीपिका असं काही म्हणाली की…
3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातही ‘अंधाधून’ सरस; किर्ती सुरेश ठरली सर्वोकृष्ट अभिनेत्री
Just Now!
X