सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलिब्रिटींची इच्छा असते. यंदा हा पुरस्कार मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला मिळाला आहे. नेहमी पेज-थ्री आणि बॉलिवूड कलाकारांना मिळणारा हा फॅशन जगतातील मानाचा मानला जाणारा पुरस्कार सई ताम्हणकरला मिळणं हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी पुण्यात झालेल्या सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला ‘आउटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स’ ह्या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सॅव्ही पुरस्कार मिळणारी ती मराठीतली पहिली अभिनेत्री आहे.

Photo : अक्षय कुमार प्रस्तुत ‘चुंबक’ या मराठी चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित  

सईने आपल्या दहा वर्षांच्या चित्रपटसृष्टीतल्या करिअरमध्ये ५० हून अधिक चित्रपट केले. अनेक नावाजलेले पुरस्कार पटकावल्यानंतर आता सॅव्ही पुरस्कारानेही तिचा गौरव झाला आहे. ‘मी स्वत:ला भाग्यवान समजते की, मी एक स्वतंत्र स्त्री आहे. जी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. सॅव्हीने दिलेल्या या पुरस्काराबद्दल मी त्यांची आभारी आहे. अशा पुरस्कारांमुळे आत्मविश्वास आणखी वाढतो. ही शाबासकी अजून काम करण्याची ऊर्जा देते. माझ्या मते, ही तर फक्त सुरूवात आहे,’ अशी प्रतिक्रिया सईने यावेळी दिली.

लवकरच लंडनमध्ये सुरू होणा-या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सई ताम्हणकरचा ‘लव सोनिया’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे. सईच्या या चित्रपटाला फेस्टिवलच्या ओपनिंग चित्रपटाचा बहुमान मिळाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar bagged savvy women empowerment awards
First published on: 19-06-2018 at 16:19 IST