02 March 2021

News Flash

‘लव सोनिया’साठी सई पुन्हा झाली ‘वजनदार’

तबरेज नुरानी दिग्दर्शित 'लव सोनिया' या इंडो-वेस्टर्न चित्रपटामध्ये सई ताम्हणकरची वर्णी लागली आहे.

सई ताम्हणकर, लव सोनिया

मराठी चित्रपटसृष्टीतून अभिनयाची सुरुवात करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर गेल्या काही काळापासून सतत बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकताना दिसून येत आहे. ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’, ‘गजनी’ आणि ‘हंटर’ या चित्रपटांमध्ये झळकलेली सई पुन्हा एका नव्या बॉलिवूड चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटासाठी ती प्रचंड मेहनत घेत असल्याचं समोर येत आहे.

तबरेज नुरानी दिग्दर्शित ‘लव सोनिया’ या इंडो-वेस्टर्न चित्रपटामध्ये सई ताम्हणकरची वर्णी लागली आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी सई भरपूर मेहनत घेत आहे. यासाठीच तिने तिचं वजनही वाढविल्याचं सांगण्यात येत आहे.

‘लव सोनिया’ चित्रपटामध्ये सई अंजली या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणार असून अंजलीप्रमाणे दिसण्यासाठी सईने १० किलो वजन वाढविलं आहे. त्यामुळे सई पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर नव्या रुपात झळकणार आहे. अंजली ही वेश्याव्यवसायातली दलाल असते. त्यामुळे अशा व्यक्तीची भूमिका करताना सईला खूप तयारी करावी लागली.

दरम्यान, ‘आजपर्यंत मी रंगवलेल्या भूमिकांपेक्षा अंजली खूपच वेगळी होती. या क्षेत्रातल्या महिलांना मी यापूर्वी कधीही भेटले नाही. किंवा त्यांच्याविषयी मला फार काही माहितीही नव्हती. त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी मला थोडी मेहनत घ्यावी लागली. या स्त्रियांची देहबोली, त्यांच्या लागण्याबोलण्याची पद्धत हे सारं काही मला शिकता आलं . त्याप्रमाणेच आयुष्य जगताना शरीराची होणारी हेळसांड आणि शरीराकडे झालेलं दुर्लक्ष यामुळे वाढलेलं वजन या साऱ्या गोष्टी मला जाणून घेता आल्या, असं सई म्हणाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:05 pm

Web Title: sai tamhankar gained 10 kg for love sonia
Next Stories
1 Kasautii Zindagii Kay 2: शाहरुखने एका मिनिटासाठी घेतलं तब्बल इतकं मानधन
2 Trailer : परिकथेपासून ते अडल्ट फिल्म्सपर्यंतचा सनीचा प्रवास पुन्हा उलगडणार…
3 बिग बींसाठी लेकीने तयार केलं ‘हे’ खास गिफ्ट
Just Now!
X