02 March 2021

News Flash

सई ताम्हणकरला मिळाले तिच्या फॅन्स कडून एक जबरदस्त सरप्राईज

फॅन्स हा सिलेब्रिटिजच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे.

सई ताम्हणकर

फॅन्स हा सिलेब्रिटिजच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. जितका मोठा सुपरस्टार तितकीच मोठी त्याची फॅन्सची संख्या. आजपर्यंत बॉलीवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्रींचे फॅन-क्लब असल्याचे आपण ऐकून आहोत, पण आता मराठी कलाकारदेखील मागे नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकरचे संपूर्ण महाराष्ट्रभर लाखो फॅन्स आहेत आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतच चालली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील अशाच काही सईच्या जबरदस्त फॅन्सनी एकत्र येउन स्थापना केली ती म्हणजे ‘सईहॉलीक्स’ नावाच्या फॅन-क्लबची. सईहॉलीक्सनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीसाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सईच्या हस्ते ‘सईहॉलीक्स’च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. हा लोगो पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव यांनी डिझाईन केला आहे. फॅन्सनी दिलेलं हे अनोख सरप्राईज पाहून सई अगदी भारावून गेली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 6:10 pm

Web Title: sai tamhankar gets fans surprise
Next Stories
1 श्रीदेवीच्या मुलीने इंस्टाग्रामवर ‘त्या’ फॉलोअर्सला फटकारले
2 बाबा राम रहीम यांची मिमिक्री केल्याप्रकरणी ‘पलक’ला अटक
3 अमिताभ बच्चन लहानग्यांसोबत फुटबॉल खेळतात तेव्हा…
Just Now!
X