25 February 2021

News Flash

Photo : सईने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो?

नेटकऱ्यांनीही दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

सई ताम्हणकर

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि नावाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री सई ताम्हणकर. सई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. तिने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. सईने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिचा कथित प्रियकर घनश्याम लालसा असल्याचं म्हटलं जात आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये सईने पिवळा हार्ट इमोजी पोस्ट केल्याने चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या फोटोवर घनश्मामने केलेली कमेंट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘हा फोटो सणाच्या निमित्ताने आणि महाराष्ट्रात आपल्याला प्रसिद्ध व्हायचं असल्याने पोस्ट केला,’ असं त्याने कमेंटमध्ये गमतीत म्हटलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही दोघांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा : तैमुरच्या एका फोटोची किंमत माहीत आहे का?

सई आणि घनश्यामने अद्याप त्यांच्या नात्याविषयी जाहीरपणे कबुली दिली नाही. पण विविध कार्यक्रमांमध्ये, पार्ट्यांमध्ये दोघांचं एकत्र दिसणं, येणं- जाणं यावरून त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याची चर्चा आहे. फक्त सईच नव्हे तर घनश्यामसुद्धा त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर सईसोबतचे फोटो शेअर करत असतो. घनश्यामसुद्धा अभिनेता असून त्याने ‘हायर’, ‘हंसा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 5:10 pm

Web Title: sai tamhankar shares her rumoured boyfriend photo on social media
Next Stories
1 करिनाला ‘छोटी माँ’ म्हटलेलं आवडणार नाही- सारा
2 तैमुरच्या एका फोटोची किंमत माहीत आहे का?
3 शाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद!’
Just Now!
X