18 October 2018

News Flash

सई ताम्हणकरची आगळीवेगळी मेकअप आर्टिस्ट!

तिचा आत्मविश्वास पाहून तुम्हाला तिच्या कामाबद्दल काहीही शंका येत नाही.

सई ताम्हणकर

मूकबधिर असणे हे सामाजिकदृष्ट्या कमीपणाचे मानले जाते. अपंग व्यक्तींना अनेकदा समाजात फार हिनतेने वागवले जाते. ‘जोश फाउंडेशन’ ही संस्था अशाच अपंग व्यक्तींना प्रेरित करून स्वबळावर जगणारे नागरिक घडवत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकरचे नाव या फाऊंडेशनशी जोडले गेले आहे. ‘जोश’ संस्थेचा मूकबधिर मुलांना स्वबळावर उभं करण्याचा उपक्रम सईला फारच आवडला आणि त्यानंतर तीदेखील या उपक्रमात सहभागी झाली.

वाचा : चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी का?; ग्राहक कल्याण समितीचा सवाल

सई गेल्या वर्षभरापासून विविध समाजकार्यांचा महत्त्वाचा भाग झाली. मग ते आमिरसोबत ‘पाणी फाऊंडेशन’चं काम असो वा ‘जोश फाऊंडेशन’चा आगळावेगळा उपक्रम असो. ‘जोश’मधील मूकबधिर विद्यार्थिनी सारा थडानी पटेल ही सध्या हेअर आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत आहे. तिने ‘फॅशन’ चित्रपट आणि ‘लॅक्मे फॅशन वीक’साठी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. प्रयत्नपूर्वकपणे मिळवलेल्या तिच्या या यशोगाथेवर ‘जोश फाऊंडेशन’ने एक लघुपट तयार केला असून, त्याचं नाव – ‘Shining Through Stars!’ असं ठेवण्यात आलं आहे. हा लघुपट ४ डिसेंबरला सईच्या उपस्थितीत मुंबईतील मिठीबाई कॉलेज येथे दाखवला गेला. या लघुपटात मेकअप आर्टिस्ट ‘सारा थडानी’कडून सईने स्वतःचा मेकअपही करून घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

या अनुभवाविषयी सई म्हणते, ‘साराचा आत्मविश्वास पाहून तुम्हाला तिच्या कामाबद्दल तिळमात्र शंका येत नाही. ती तिचं काम खूप मनापासून आणि कल्पकतेने करते. तिचं काम पाहिल्यानंतर तिच्या मूकबधिर असण्यामागच्या तुमच्या ज्या काही शंका असतील त्या अगदी झटक्यात दूर होतील. समाजात मूकबधिर मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूपच दयनीय आहे. आपण नेहमी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना आपल्या सहानुभूतीची गरज आहे असं समजतो. पण हे चुकीचं आहे. खरंतर ही मुलं खूप धीट आणि प्रचंड हुशार असतात. खूप मेहनतीने त्यांना गोष्टी शिकाव्या लागतात पण त्याही ते आपल्यापेक्षा जास्त जाणीवपूर्वक शिकतात. विशेष म्हणजे ही मुलं स्वावलंबी असतात. समाजाने त्यांना सहजतेने वागवलं पाहिजे. माणसाची ओळख त्यांच्या कामातून असते. आणि या मुलांचं हे काम नक्कीच त्यांची स्वतंत्र ओळख करून देतं.’

Year End 2017 Special वाचा : प्रियांका, ऐश्वर्याला मागे टाकत सनीच ठरली बहुचर्चित सेलिब्रिटी

गेली अनेक वर्ष ‘जोश फाऊंडेशन’ मुकबधिरांसाठी काम करतेय. यातील काही विद्यार्थी इंजिनीअर, फोटोग्राफर, इंटेरियर डिझायनर तर काही ग्राफिक डिझायनर म्हणून कार्यरत असून, स्वतःच्या पायावर उभे आहेत.

First Published on December 7, 2017 4:14 pm

Web Title: sai tamhankar supports josh foundation