News Flash

सई ताम्हणकर ठरली ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर’

'या' सिनेमातील अभिनयासाठी मिळाला पुरस्कार

सई ताम्हणकर- अमेय गोसावी सई ताम्हणकरने २०१३ मध्ये व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीशी लग्न केलं होतं. मात्र हे लग्न केवळ दोनच वर्ष टिकलं. २०१५ मध्ये सईने अमेयला घटस्फोट दिला.

प्रत्येक अभिनेत्याला आपला परफॉर्मन्स आपल्या रसिकांना नैसर्गिक वाटावा, असं वाटत असतं. त्यासाठी अनेक कलाकार कसून मेहनतही घेताना आपण पाहतो. अभिनेत्री सई ताम्हणकरला तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी नेहमीच तिच्या चाहत्यांची वाहवा मिळाली आहे आणि आता ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’नेही सईच्या ‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातील भूमिकेसाठी ‘मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सईच्या नैसर्गिक अभिनयाला पोचपावती दिलीय.

झी टॉकीजचे मनापासून आभार मानताना सई म्हणते, “माझ्या कारकिर्दीत झी नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिलंय. मला असं वाटतं, तुम्ही कितीही वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलात, तरीही परफॉर्मन्ससाठी जेव्हा पुरस्काराची दाद मिळते, तेव्हा ती लाखमोलाची असते. अशी शाबासकी तुम्हाला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा देते. विशेष धन्यवाद माझ्या दिग्दर्शकाला द्यावेसे वाटतायत. दिग्दर्शक उपेंद्र सिधयेने मला पायल मेहताच्या भूमिकेत पाहिलं. माझी आणि अमेयची जोडी रूपेरी पडद्यावर चांगली दिसेल, हे त्याचे व्हिजन होते. उपेंद्रच्या रूपात मला एक चांगला मित्र मिळाला.”

आणखी वाचा : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप

सध्याच्या न्यू नॉर्मलमध्ये नेहमीसारखा मोठा पुरस्कार सोहळा झाला नाही, याची खंत सईला वाटली. ती पुढे म्हणाली, “स्टेजवर जाऊन पुरस्कार घेणं, ही आम्हा अभिनेत्यांसाठी अभिमानाची बाब असते. पण यंदाच्या परिस्थितीमध्ये अर्थातच हे शक्य नव्हतं. त्यामुळे यंदा पुरस्कार सोहळे खूप मिस करतेय.”

“ओटीटीवर सिनेमा रिलीज झाल्यावर काहींनी तो पहिल्यांदाच पाहिला. काहींनी परत पाहिला. माझा आणि अमेयचा स्लो-मोशनमधला डान्स अनेकांना आवडला. अशी अतरंगी भूमिका तूच करू शकतेस, तूच अशी क्रेझी आहेस अशा विविध प्रतिक्रिया सतत येत असतात. त्या खूप एन्जॉय करते”, अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:57 pm

Web Title: sai tamhankar won most natural performer of the year award ssv 92
Next Stories
1 ‘बिग बॉस’च्या घरात पडली दुसरी विकेट; टीम हरताच या अभिनेत्यानं सोडलं घर
2 “आर्यन आणि न्यासा पळून गेले तर?”, शाहरुख आणि कजोलने दिले हे उत्तर
3 ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप
Just Now!
X