मराठी सिनेसृष्टीत अग्रस्थानी असलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. स्टाइल आयकॉन अशीही तिची एक खास ओळख आहे. नुकतेच तिने एक फोटोशुट केले आहे. छायाचित्रकार भारत पवार याच्यासाठी तिने हे फोटोशुट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती फारच सुरेख दिसते यात काही शंका नाही.
याचा एक व्हिडिओही सईने तिच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सईचे अनेक रंग बघायला मिळत आहेत. वेगवेगळ्या लूकसाठी ती मेहनत घेताना दिसते आहे. हा फोटो शूटचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच असेल हे मात्र नक्की आहे. स्वप्निल शिंदे आणि पुर्वा परदेशी यांनी सईसाठी खास आउटफिट डिझाइन केले आहेत तर मेकअप आर्टिस्ट मालकोलम फर्नांडिस आणि केशभूषाकार सुहास शिंदे यांनी सईच्या सौंदर्याला आणखीन खुलावले आहे.
‘सनई चौघडे’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे’, ‘पुणे ५२’, ‘टाइम प्लीज’, ‘दुनियादारी’, ‘पोरबाझार’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘क्लासमेट्स’, ‘लालबाग परळ’, ‘तू हि रे’, ‘फॅमिली कट्टा’, ‘वाय झेड’, ‘वजनदार’ यांसारख्या मराठी सिनेमातून सईने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ‘गजिनी’ या हिंदी चित्रपटातून सईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘सिटी ऑफ गोल्ड’, ‘हंटर’ या हिंदी सिनेमांत तिने अभिनय केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 9:01 pm