22 November 2019

News Flash

‘सेक्रेड गेम्स २’साठी चाहत्यांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा?

प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे

सेक्रेड गेम्स २

वेब विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज म्हणून आज ‘सेक्रेड गेम्स’कडे पाहिलं जातं. ‘सेक्रेड गेम्स’च्या पहिल्या भागाने तगडे कलाकार, कथानक, अभिनय, संवाद आणि सिनेमॅटीक लिबर्टीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यामुळेच याच्या दुसऱ्या भागातही असंच काहीसं असेल असा अंदाज प्रेक्षकांना आहे. त्यामुळेच चाहत्यांना या दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. ‘सेक्रेड गेम्स २’ ही सीरिज २८ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती. मात्र आता या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

‘सुत्रांच्या माहिती’नुसार, ‘सेक्रेड गेम्स २’चं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. मात्र अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही सीरिज आता ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या सैफच्या आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाचं लंडनमध्ये चित्रीकरण सुरु आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या ‘बोले चुडिया’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे सध्यातरी या दोन्ही कलाकारांकडे या सीरिजसाठी वेळ नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच ‘सेक्रेड गेम्स २’ च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, २००६ साली विक्रम चंद्रा लिखित एका कादंबरीवर ‘सेक्रेड गेम्स’ची कथा आधारलेली आहे. यात सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

First Published on June 18, 2019 1:07 pm

Web Title: saif ali khan and nawazuddin siddiqui starrer sacred games 2 release pushed august ssj 93
Just Now!
X