News Flash

सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ प्रदर्शित होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

१० सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

करोना व्हायरसमुळे चित्रपटसृष्टीला मोठा फटका बसला आहे. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे निर्मात्यांना चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करावे लागत आहेत. आता अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘भूत पोलीस’ देखील ओटीटी प्लटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अभिनेता आयुष शर्माचा ‘अंतिम’ चित्रपट, अजय देवगणच्या ‘मैदान’ चित्रपटानंतर आता सैफ अली खानचा ‘भूत पोलीस’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. निर्माते रमेश तौरानी यांनी सध्याची परिस्थिती पाहाता ‘भूत पोलीस’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : नेहा आणि रोहनप्रीतमध्ये झाले भांडण? पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली होती. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जानेवारी महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘भूत पोलीस’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 4:16 pm

Web Title: saif ali khan arjun kapoor jacqueline fernandez starrer bhoot police release on ott avb 95
Next Stories
1 ‘जनहित में जारी’ या चित्रपटात कंडोम विकताना दिसणार नुसरत भरुचा
2 VIDEO: ‘तौक्ते’ चक्रीवादळात राखी सावंतच्या घराचं नुकसान ; म्हणाली, “मला ‘टेन्शन आलंय”
3 गायक अरिजीत सिंहच्या आईचे करोनामुळे निधन
Just Now!
X