13 August 2020

News Flash

सैफ अली खानची मुलगी सुशिलकुमार शिंदे यांच्या नातवाच्या प्रेमात ?

सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात.

Sara Ali Khan dating Veer Pahariya grandson of Sushil Kumar Shinde : सारा करण जोहरच्या आगामी 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ती प्रचंड चर्चेत आली आहे. साराचा कथित प्रियकर वीर पहारिया याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे दोघांचे प्रेमकरण अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

सध्या सोशल मिडीयावर अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा आणि तिचा कथित प्रियकर वीर पहारिया यांच्या प्रेमप्रकरणाची प्रचंड चर्चा रंगली आहे. सारा करण जोहरच्या आगामी ‘स्टुडंट ऑफ द इयर’च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच ती प्रचंड चर्चेत आली आहे. साराचा कथित प्रियकर वीर पहारिया याच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे दोघांचे प्रेमकरण अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे. सध्या साराचे एक छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार सारा सोबत असलेला हा मुलगा वीर पहारिया आहे. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सारा आणि वीर दुबईत एकत्र शिकतात. वीर आणि सारा हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा चर्चाही सध्या सुरु आहेत.  या दोघांच्या फोटोंमुळे मात्र या चर्चांसाठी चांगलेच खाद्य मिळाले आहे.
vr

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2016 11:06 am

Web Title: saif ali khan beautiful daughter sara ali khan dating veer pahariya grandson of sushil kumar shinde see pictures
Next Stories
1 सैराटच्या ‘परश्या’, ‘अर्ची’ला पाहण्यासाठी झुंबड उडाल्याने गोंधळ
2 ‘बागी’मधील धारानृत्यामुळे रेल्वेवर पैशांचा पाऊस
3 ‘सैराट’ची पहिल्या आठवड्यात २५ कोटींची विक्रमी कमाई
Just Now!
X