News Flash

जेव्हा सैफ करीना कपूरला म्हणायचा ‘मॅम’; “मीच पुढाकार घेतला” करीनाचा खुलासा

करीना आणि सैफच्या पहिल्या सिनेमाचा किस्सा

बॉलिवूडमधील हिट जोड्यांपैकी एक म्हणजेच करीना कपूर आणि सैफ अली खान यांची जोडी. सैफ आणि करीनाची लव्ह स्टोरीदेखील चांगलीच गाजली. अनेक वर्ष डेट केल्यानंतर सैफ आणि करीनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. जवळपास ११ वर्ष वयाने लहान असलेल्या करीनाशी लग्न केल्यामुळे सैफ आणि करीनाचं नातं अधिक चर्चेत आलं होतं.

लग्नाआधी आणि एकमेकांच्या प्रेमात पडण्याआधी सैफ आणि करीनाचं नातं मात्र फारचं वेगळं होतं. त्यावेळी दोघं एकमेकांशी फारसं बोलायचे नाही. करीना आणि सैफ पहिल्यांदा एकत्र झळकले ते ‘ओमकारा’ या सिनेमात. या सिनेमातील सैफचं लंगडा त्यागी हे पात्र चांगलचं लोकप्रिय ठरलं. सैफच्या ही निगेटिव्ह भूमिका त्याच्या करिअरमधील महत्वाची भूमिका ठरली.

‘ओमकारा’च्या सेटवर जेव्हा करीना आणि सैफची ओळख झाली तेव्हा करीना शाहिद कपूरला डेट करत होती. तर सैफही एका वेगळ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. करीना आणि सैफ आधीपासून एकमेकांना ओळखत असले तरी ते ओमकाराच्या सेटवर एकमेकांशी जास्त बोलायचे नाही.

..तेव्हा तो ‘गुड मॉर्निंग मॅम’ म्हणायचा

एका मुलाखतीत करीनाने सिनेमाच्या सेटवरील अनुभव सांगितला होता. यात ती म्हणाली होती, “सैफ वेगळ्या पिढीतील आहे. ओमकाराच्या सेटवर आम्ही मुश्किलीने एकमेकांशी बोलत असू. जेव्हा मी त्याला गुड मॉर्निंग बोलायचे तेव्हा तो ‘गुड मॉर्निंग मॅम’ असं म्हणायचा.तो माझ्याशी खूप आदराने वागायचा. त्यामुळे तो एक उत्तम माणूस असल्याचं मला तेव्हाच लक्षात आलं होतं.”

पुढे करीना म्हणाली होती की एका महिलेला आवडेल असंच सैफ अली खानचं व्यक्तीमत्व आहे. यावेळी नात्यामध्ये पुढे जाण्यासाठी मलाच पुढचं पाऊल उचलावं लागल्याचं करीना म्हणाली होती. ती म्हणाली, “सैफ अशी व्यक्ती नाही जी महिलांच्या बाबतीत पुढाकार दर्शवेल. तो कधीही पहिलं पाऊल टाकतं नाही. याबाबतीत तो खूपच ब्रिटीश आहे.”

मलाच पुढाकार घ्यावा लागला

पुढे करीना म्हणाली, “जेव्हा मीच पुढाकार घेतला तेव्हा त्याला विश्वास बसला नाही की करीना असं काही करू शकते. त्याने का असं विचारं. मी फक्त त्याला इशारा केला. मात्र यावेळी त्याच्यावर एखादी बिल्डिंग कोसळल्यासारखं त्याच्याकडे पाहून मला जाणवलं. का ते माहित नाही. त्याला धक्का बसला ती त्याला आनंद झाला हे माहित नाही. मात्र नंतर सर्व काही ठीक झालं आम्ही रिलेशनशिपमध्ये अडकलो.मात्र या सर्वासाठी मी स्वत:ला जबाबदार समजते.” असं म्हणत करीनाने त्यांच्या नात्याचा उलगडा केला होता.

२०१२ सालात करीना आणि सैफ विवाहबंधनात अडकले. २०१६ मध्ये करीनाने तैमूरला जन्म दिला. तर २०२१ मध्ये त्यांच्या संसारात दुसऱ्या बाळाचं आगमन झालं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 10:39 am

Web Title: saif ali khan called kareena kapoor mam on omkar set during shooting kpw 89
Next Stories
1 प्रभासच्या ‘आदिपुरुष’मध्ये झळकणार सिद्धार्थ शुक्ला; ‘ही’ महत्वाची भूमिका साकारणार
2 गीता मॉं ने गपचुप केलं लग्न? सिंदूर लावलेला फोटो केला शेअर
3 करोनामुळे काम मिळतं नसल्याने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो – हिमानी शिवपुरी
Just Now!
X