20 November 2017

News Flash

सारा अली खानने केली सलॉन मॅनेजरला शिवीगाळ!

सेलिब्रिटी किड्सची अशी वागणूक कितपत योग्य?

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: July 17, 2017 5:11 PM

सारा अली खान

कलाकारांच्या मुलांवर प्रसारमाध्यमांच्या नेहमीच नजरा असतात. सध्याच्या घडीला चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांची मुलं चर्चेत आहेत. बी- टाऊनचं हे यंग जनरेशन चर्चेत असण्याचं आणखी एक कारण म्हणजे इतरांसोबतची त्यांची वर्तणूक. कधीकधी आपल्या वाट्याला आलेल्या सर्व सुविधांमुळे सेलिब्रिटी मुलांच्या डोक्यातही वेगळीच हवा जाते याचा प्रत्यय नुकताच आला. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आणि तिची खास मैत्रीण रिआ चक्रवर्ती यांनी एका सलॉन मॅनेजरसोबत अरेरावी केल्याचं वृत्त ‘पिंकविला’ वेबसाइटने प्रसिद्ध केलंय.

रिआ आणि सारा एका सलॉनमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचं कार्ड चालत नसल्याची माहिती देण्यासाठी सलॉनचा मॅनेजर त्या ठिकाणी आला. तेव्हा या दोघीही त्याच्याशी वरच्या आवाजात आणि चुकीच्या भाषेत शिवीगाळ करत बोलू लागल्या. त्यावेळी सलॉनमध्ये असलेल्या दुसऱ्या ग्राहकाने त्यांना हळू आवाजात बोलण्यास सांगितलं. कारण त्यावेळी काही लहान मुलंही तेथे होती. पण, रिआ आणि सारा काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या.

वाचा : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

त्यानंतर दोघीही सलॉनच्या बाहेर आल्या त्यावेळी छायाचित्रकारांनी लगेचच त्यांचे फोटो घेण्यास सुरुवात केली. छायाचित्रकारांची गर्दी पाहताच साराने लगेचच चेहरा लपवत त्या ठिकाणाहून निघण्याची घाई केली. बॉलिवूडमध्ये कारकिर्दीला सुरुवात झाली नसतानाही या स्टारकिड्सची ही अशी वर्तवणूक अनेकांसाठी धक्कादायक ठरतेय. तेव्हा आता आपल्या मुलीच्या या अशा बेताल वागण्यावर सैफ आणि त्याची पूर्वाश्रीची पत्नी अमृता सिंग यांच्या काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सारा सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत असून, अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून ती झळकणार आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.

First Published on July 17, 2017 5:11 pm

Web Title: saif ali khan daughter sara ali khan and her friend rhea chakraborty misuse celebrity status create a bustle at a salon after their cards get declined