News Flash

सैफ अली खानने काढला नवा टॅट्यू?

सध्या सोशल मीडियावर सैफचा फोटो व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो पत्नी करीना कपूर खानसोबत देखील वेळ घालवताना दिसत आहे. ते दोघं सतत एकत्र फिरताना दिसत आहेत. आता सैफने त्याच्या हातावार एक नवा टॅट्यू काढला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर सैफ अली खानचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये तो पत्नी करीना कपूरसोबत दिसत आहे. दरम्यान सैफने हातावर काढलेल्या टॅट्यूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा टॅट्यू पाहून सैफने नवा टॅट्यू काढला असल्याचे म्हटले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora (@bollywood_news_23)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सैफ अली खानने आकाशी रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर करीनाने लाइट पिंक रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. इन्स्टा बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजने त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2020 11:00 am

Web Title: saif ali khan flaunts his new tattoo with kareena kapoor khan avb 95
Next Stories
1 Video: ‘पुरुषांवरील घरगुती हिंसाचार मान्य केला जाणार नाही’, पूजा बेदीचा ‘त्या’ जाहिरातीवर आक्षेप
2 बिकिनीतील फोटोंवरून ट्रोल करणाऱ्यांवर ‘तारक मेहता..’मधील सोनू भडकली, म्हणाली..
3 सनी लिओनी आई तर इमरान हाशमी वडील… बिहारमधील विद्यार्थ्याच्या आयकार्डवर इमरान म्हणतो…
Just Now!
X