सैफ अली खानला रानडुकराच्या शिकारप्रकरणी इंटरपोलने कायदेशीर नोटीस बजावली आहे. बुल्गेरियात असताना सैफ अली खानने एका रानडुकराची शिकार केली होती. ही शिकार त्याला महागात पडणार असेच आता दिसते आहे. बुल्गेरियन सरकारच्या आदेशानंतर इंटरपोलने सैफ अली खानला नोटीस बजावली आहे.

१९९८ मध्ये हम साथ साथ है या सिनेमाच्या शुटिंगच्या वेळी काळविटाची शिकार केल्याप्रकरणीही सैफ अली खान अडचणीत आला होता. आता रानडुकराच्या शिकाराचे हे नवे प्रकरण समोर आले आहे. रानडुकराच्या शिकारीप्रकरणी सैफ अली खानच्या एजंटला अटक करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. या एजंटनेच शिकारीचा कार्यक्रम आखला होता. मात्र या एजंटकडे परवाना आणि परमिट नव्हते अशी माहिती समोर आली आहे. इंटरपोलने सैफ अली खानला नोटीस बजावल्यानंतर मुंबई पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे अशीही माहिती समोर येते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.