News Flash

सैफ बॉलीवूड चित्रपट पाहत नाही- करिना

बॉलीवूड चित्रपटातून करोडोंची कमाई करणारा सैफ अली खान मात्र स्वतः हिंदी चित्रपट पाहत नाही.

| November 22, 2013 07:17 am

बॉलीवूड चित्रपटातून करोडोंची कमाई करणारा सैफ अली खान मात्र स्वतः हिंदी चित्रपट पाहत नाही. याचा खुलासा चक्क करिना कपूरने केला आहे.
‘एलओसी कारगिल’, ‘ओमकारा’, ‘कुर्बान’ आणि ‘एजन्ट विनोद’ या चित्रपटात सैफसोबत काम करणारी ३३ वर्षीय करिना म्हणाली की, आम्ही वैयक्तिक जीवन आणि व्यावसायिक जीवन एकमेकांपासून वेगळे ठेवतो. सैफ क्वचितच हिंदी चित्रपट पाहतो. तो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो, पण ते पाहत नाही. मी कोणत्या चित्रपटात काम करत आहे हे त्याला अजीबात माहित नसते. मी कोणता चित्रपट करत आहे किंवा कोणाबरोबर करत आहे, असं त्याने मला केव्हाही विचारलेल नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे वैयक्तिक जीवनास व्यावसायिक गोष्टींपासून पूर्णपणे दूर ठेवतो. केवळ एकाच क्षेत्रात असल्यामुळे आम्ही दोघेही एकत्र आहोत, असे नाही.
करीनाचा ‘गोरी तेरे प्यार मै’ हा चित्रपट आजचं प्रदर्शित झाला आहे. बॉलीवूड पार्टींमध्ये पती-पत्नीने एकत्र जाने आवडत नसल्याचेही ती म्हणाली. सैफपेक्षा १० वर्षांनी लहान असलेली करिना त्याच्याकडून रोज काही नवीन शिकते, असे तिने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2013 7:17 am

Web Title: saif ali khan hardly watches bollywood films says wife kareena kapoor
टॅग : Saif Ali Khan
Next Stories
1 हृतिकच्या डोकेदुखीने पुन्हा डोकं वर काढलं
2 ‘केबीसी’ फायनलला बीगबींचा ‘डबल धमाका’?
3 पाहाः रणवीर-अर्जुनच्या ‘गुंडे’चा ट्रेलर
Just Now!
X