बॉलिवूडचा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खानने यश चोप्राच्या ‘परंपरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. आपल्या निराळ्या अंदाजाने आणि अभिनयाने सैफने स्वत:चा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला. आता सैफने आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. या आत्मचरित्रात त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास, खासगी जीवन, यशापयश आणि जीवनाशी निगडीत इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर प्रकाश पाडला जाईल. त्याचं हे आत्मचरित्र पुढच्या वर्षी प्रकाशित करण्यात येईल.
याविषयी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बदलल्या आहेत आणि त्यांचं जतन करून न ठेवल्यास बदलत्या वेळेनुसार त्या हरवतील. एकदा मागे वळून त्या सर्व गोष्टी साठवून घेणं चांगलंच आहे. हा एका प्रकारे स्वार्थी प्रवास आहे पण मला यावर पूर्ण विश्वास आहे की लोकांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.” सैफच्या आत्मचरित्राचं नाव काय असेल हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र सोशल मीडियावर त्यावरून जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा : सुशांतचं दु:ख विसरून पहिल्यांदा अंकिताच्या चेहऱ्यावर दिसलं हास्य; केली महालक्ष्मीची पूजा
सैफच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तो पुन्हा एकदा बाबा होणार आहे. सैफची पत्नी करीना कपूर खान पुन्हा एकदा गरोदर असून कुटुंबात लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 5:48 pm