News Flash

करिश्माने शेअर केला तैमुरचा क्यूट फोटो

तैमुर कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात

करिना कपूर खान, तैमुर, सैफ अली खान

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान पतौडी उद्या एक वर्षांचा होणार आहे. सैफच्या या छोट्या नवाबचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला जाईल, याविषयी अनेकांनाच उत्सुकता आहे. त्याची मावशी करिश्मा कपूरने चाहत्यांची ही उत्सुकता अधिक न ताणता त्याच्या बर्थडे प्लॅनिंगची माहिती प्रसारमाध्यमांना काही दिवसांपूर्वी दिली होती. त्याचा वाढदिवसाचं मोठं सेलिब्रेशन नसलं तरी जवळच्या नातेवाईकांसाठी हा फार महत्त्वाचा दिवस असणार हे मात्र नक्की.

त्याच्या पहिल्या वाढदिवसासाठी सैफ आणि करिना दिल्लीला रवाना झाले असून, तैमुर पॅलेसमध्ये त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार आहे. सध्या कपूर आणि खान कुटुंबीय पतौडी पॅलेसमध्ये तैमुरच्या वाढदिवसाच्या तयारीला लागले आहेत. यातच करिश्मा कपूरने तैमुरचा घोडेस्वारी करतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तैमुर सैफसोबत घोडेस्वारी करताना दिसत आहे. तर करिना शेजारी त्याच्यावर लक्ष ठेवून उभी आहे. या फोटोला आतापर्यंत ९० हजारांहून लाइक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी हा फोटो शेअरही केला आहे.

तैमुरच्या वाढदिवसानिमित्त फॅमिली गेट टू गेदरचे आयोजन करण्यात आले आहे. सोहा अली खान आणि कुणाल खेमू आपल्या मुलीसह तैमुरच्या पहिल्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सहभागी होईल. मात्र जवळच्या मित्रमंडळींना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. शाहरूख अब्राहमसोबत तर करण जोहर यश आणि रुही या आपल्या जुळ्या मुलांसह पार्टीत सहभागी होणार आहेत.

तैमुर कुठेही दिसला तरी प्रसारमाध्यमांच्या नजरा त्याच्याकडेच वळतात. त्याच्या प्रत्येक लूकची चर्चा होते. त्याच्या आवडीनिवडीबद्दलही अनेक गोष्टी सोशल मीडियावर लिहिल्या जातात. त्यामुळे त्याच्या पहिल्या वाढदिवसाबद्दलही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होईल असं म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 4:34 pm

Web Title: saif ali khan kareena kapoor khan son taimur birthday karishma share picture goes viral
Next Stories
1 Hichki Trailer Out : राणीच्या ‘हिचकी’ची पहिली झलक
2 २०१८ मध्ये मिलिंद सोमण करणार लग्न?
3 सलमानची आणखी एक तथाकथित प्रेयसी क्रिकेटरशी वाढवतेय जवळीक
Just Now!
X