25 September 2020

News Flash

सैफ विसरला पतौडी पॅलेसचा रस्ता अन्..

करीनाच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त पतौडी पॅलेसमध्ये बॉलिवूड कलाकारांसाठी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे.

सैफ अली खान, करीना कपूर

येत्या दोन दिवसांत अभिनेत्री करीना कपूरचा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस ती पतौडी पॅलेसमध्ये साजरा करणार आहे. यासाठी सैफ अली खान, करीना व तैमुर पतौडी पॅलेसकडे रवाना झाले होते. मात्र तिथे जाताना सैफ पॅलेसचा रस्ताच विसरला.

हरयाणातील या पॅलेसकडे जाण्याऐवजी सैफ बाजाराच्या दिशेने पुढे गेला. थोडं अंतर पार केल्यानंतर आपण चुकीच्या रस्त्याने पुढे जात असल्याचं सैफच्या लक्षात आलं. तेव्हा तिथल्या काही विद्यार्थ्यांना त्याने पॅलेसकडे जाण्याचा रस्ता विचारला. ‘नवाब’ सैफला पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्यांनी पॅलेसकडे जाण्याचा रस्ता तर सांगितलाच पण त्याबदल्यात सैफसोबत सेल्फी काढण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

आणखी वाचा : ”दुसऱ्यांवरच ट्विट करणार की कामसुद्धा करणार,” असं म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अर्जुनचं मजेशीर उत्तर 

करीनाच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त पतौडी पॅलेसमध्ये बॉलिवूड कलाकारांसाठी जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ सैफ, करीना व तैमुर लंडनमध्ये होते. सैफ व करीना त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगनिमित्त तिथे होते तर तैमुर सुट्ट्यांचा आनंद घेत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 5:40 pm

Web Title: saif ali khan kareena kapoor taimur forget way to pataudi palace ssv 92
Next Stories
1 मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल : इंडिया गोल्ड विभागातील चित्रपटांची यादी जाहीर
2 Photo : चीनमधील ‘हा’ अभिनेता होतोय बॉलिवूडमध्ये लोकप्रिय
3 ”दुसऱ्यांवरच ट्विट करणार की कामसुद्धा करणार,” असं म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अर्जुनचं मजेशीर उत्तर
Just Now!
X