02 March 2021

News Flash

Photo : सरताज सिंगनंतर सैफचा कधी न पाहिलेला अवतार

वाढलेली दाढी, केसांच्या जटा असा सैफचा लूक हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपची आठवण करुन देतो.

सैफ अली खान

‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजनंतर अभिनेता सैफ अली खान चांगलाच चर्चेत आला. सरताज सिंगनंतर चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यास सैफ प्राधान्य देत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो ‘हंटर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तयारी करत आहे. या चित्रपटात तो एका साधूची भूमिका साकारणार आहे. सैफचा सेटवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याचा कधीच न पाहिलेला अवतार यामध्ये दिसत आहे.

वाढलेली दाढी, केसांच्या जटा असा सैफचा लूक हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपची आठवण करुन देतो. ‘पायरेट्स ऑफ कॅरिबेन’ सीरिजमध्ये जॉनी अशाच लूकमध्ये दिसला होता. सैफचा हा लूक थक्क करणारा आहे.

वाचा : पहिल्यांदाच ‘कपल’ म्हणून समोर येणार रणबीर- आलिया

या लूकविषयी सैफ म्हणाला की, ‘हंटर या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग राजस्थानमध्ये झालं. शूटिंगपूर्वी मेकअप करण्यासाठी मला रोज ४० मिनिटांचा वेळ लागत असे. ५० दिवसांच्या या शूटनंतर माझ्यातही अनेक बदल झाले आणि ते बदल स्पॉटबॉयलाही जाणवले. चित्रपटाच्या महत्त्वाच्या भागाचं शूटिंग संपलं असून मी लवकरच माझ्या क्लिन शेव्ह लूकमध्ये दिसेन.’

सैफ अली खानचे ‘शेफ’, ‘कालाकांडी’ यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटले. मात्र ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजनंतर सैफचे ग्रह बदलले. यातील सैफचं अभिनय आत्तापर्यंतच्या त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अभिनय असल्याचं म्हटलं गेलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 5:38 pm

Web Title: saif ali khan look in hunter is unrecognisable as he transforms into a sadhu
Next Stories
1 ‘वंडर वुमन’च्या सिक्वलमध्ये झळकणार ही बॉलिवूड अभिनेत्री
2 सलमानची संपत्ती आहे तरी किती? वाचा
3 पहिल्यांदाच ‘कपल’ म्हणून समोर येणार रणबीर- आलिया
Just Now!
X