News Flash

आता होणार ‘तांडव’, सैफच्या आगामी सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

सीरिजचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजनंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणखी एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज अॅमोझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘तांडव’ वेब सीरिज ही राजकारणावर आधारित असून अली अब्बास जफरने निर्मिती केली आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

‘तांडव’ या वेब सीरिजच्या कथानकात राजकीय पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या २ मिनिटे ५९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दिल्लीमध्ये घडणाऱ्या ‘तांडव’मध्ये सत्तासंघर्ष दाखवण्यात आला आहे. सत्तेच्या खेळात चूक किंवा बरोबर, सत्ता मिळवणं, ती टिकवणं आणि त्यासाठी शक्य असेल ते सगळं करणं हे सर्व या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘सुलतान’ हे चित्रपट दिग्दर्शित करणारे अली अब्बास जफर ‘तांडव’ या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची असणार आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार दिसणार आहेत.

आणखी वाचा- तापसी पन्नूने थ्रोबॅक फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडने केली कमेंट

या सीरिजच्या माध्यामातून अली अब्बास जफर यांच्या सोबतच डिंपल कपाडिया डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहेत. तसेच या सीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खान, झीशान अय्यूब आणि सुनील ग्रोव्हर एकदम वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. ‘तांडव’ ही वेब सीरिज १५ जानेवारी २०२१मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 3:34 pm

Web Title: saif ali khan political drama series tandav trailer is out avb 95
Next Stories
1 “ते म्हणाले माझ्याशी कोणीच लग्न करणार नाही”; मुलींना दत्तक घेण्याच्या निर्णयाबाबत रवीना झाली व्यक्त
2 ‘हे पहा मी भारतीयच’; दिलजीतने दिला पुरावा
3 तापसी पन्नूने थ्रोबॅक फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडने केली कमेंट
Just Now!
X