News Flash

सैफ अली खानने घेतला लसीचा पहिला डोस

फोटोग्राफर वरिंदर चावलाने शेअर केला फोटो

तिसऱ्या टप्प्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणाला आता सुरुवात झाली आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील सहव्याधी असणाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटीजही ही लस घेताना दिसत आहेत.

साऊथ सुपरस्टार कमल हसन आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्यानंतर आता बॉलिवूड स्टार सैफ अली खाननेही करोना प्रतिबंधक लस घेतली आहे. फोटोग्राफर वरिंदर चावलाने सैफचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 50 वर्षीय सैफ अली खानने आज करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी त्याने खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा टी-शर्ट असा पोशाख परिधान केला होता आणि तो रांगेत उभा राहून करोना लस घेण्याची प्रतिक्षा करत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

यापूर्वी लस घेतलेले अभिनेते कमल हसन आणि सतीश शाह यांनी आपला लसीकरणादरम्यानचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. सतीश शाह यांनी सांगितलं की, ही लस घेण्यासाठी त्यांना 3 तास उन्हात उभं राहून वाट पाहायला लागली होती. तर कमल हसन यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, लोकांनी लस घेण्यास लाजू नये. जेव्हा आपली पाळी येईल, त्यावेळी लस टोचून घ्यावी.

सैफ अली खान काही दिवसांपासून चर्चेत आहे ते त्याच्या लहान बाळामुळे. त्याची बायको करीना कपूर खान हिने काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्यांचा पहिला मुलगा तैमूर हाही कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो.

कामासंदर्भात बोलायचं झाल्यास सैफ सध्या ‘बंटी और बबली २’, ‘भूत पुलिस’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये काम करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 5:55 pm

Web Title: saif ali khan receives first dose of covid 19 vaccine vsk 98
Next Stories
1 आत्ताच वाद का? २०१३ मध्ये पण असे घडले होते; सीतारामन यांचे स्पष्टीकरण
2 वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली भावूक, शेअर केली पोस्ट
3 वडिलांच्या मृत्यूनंतर अनिल अंबानी यांनी करण जोहरला दिले होते गुप्त पत्र
Just Now!
X