26 November 2020

News Flash

तैमुर देखील अभिनेता होणार का?; जॅकलिनच्या प्रश्नावर सैफ अली खान म्हणाला…

तैमुर कुठल्या क्षेत्रात करणार करिअर? चाहत्यांना पडला प्रश्न

गेल्या काही काळात पाहायला गेलं तर सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिडची चर्चा अधिक पाहायला मिळते. या सर्व स्टारकिड्समध्ये सैफी अली खान आणि करिना कपूर यांचा लाडका लेक ‘तैमुर’ हा कायमच माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरतो. आपल्या अनोख्या शैलीमुळे कुटुंबासह असंख्य चाहत्यांना भूरळ घालणारा हा छोटा नवाब देखील अभिनयातच करिअर करणार आहे, अशी भविष्यवाणी स्वत: सैफने केली आहे.

अमानदा केर्नी आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत केलेल्या एका पॉडकास्ट चॅटमध्ये सैफने तैमुरच्या करिअरवर भाष्य केलं. तो म्हणाला, “माजी आई एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने १६ वर्षीच करिअरची सुरुवात केली होती. आईनं सत्यजित रे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. शिवाय माझी बहिण, पत्नी, घटस्फोटीत पत्नी, माझी मोठी मुलगी यासर्व अभिनयसृष्टीत कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर तैमुरच्या रक्तातच अभिनय आहे. तो आत्ताच आमचं खूप मनोरंजन करतोय. याचा अर्थ मोठा झाल्यावर तो देखील सिनेसृष्टीतच करिअर करेल असं मला वाटतं.” यापूर्वी सैफनं स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत देखील तैमुर अभिनेता होणार असं म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:43 pm

Web Title: saif ali khan reveals about taimur ali khan career mppg 94
Next Stories
1 टेलिव्हिजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा रंगणार ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये
2 ‘जयपूर पिंक पँथर’वर येतेय वेब सीरिज; अभिषेकने शेअर केलेला ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
3 अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून महेश टिळेकर आणि आरोह वेलणकर यांच्यात जुंपली
Just Now!
X