01 December 2020

News Flash

सैफने सांगितला पतौडी पॅलेसवर करीना व मुलांसोबत राहण्याचा प्लॅन

ऑगस्टमध्ये करीनाने तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली.

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी नव्या वर्षांत आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. ऑगस्टमध्ये करीनाने तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने पतौडी पॅलेसवर करीना आणि मुलांसोबत राहण्याबाबतचा प्लॅन सांगितला.

‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने पतौडी पॅलेसवर कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची इच्छा बोलून दाखवली. तो म्हणाला, “पतौडी पॅलेसवर मी करीना आणि दोन मुलांसोबत निवांत राहू शकतो. मी झाडं लावेन, स्विमिंग करेन, स्वयंपाक करेन, पुस्तकं वाचेन, कधीतरी मित्रांना भेटेन. मुंबईत आमचं घर असल्याने इथे फक्त कामानिमित्त आम्ही येऊ शकतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

आणखी वाचा- पतौडी पॅलेस ८०० कोटींना विकत घेतला ? सैफने केला खुलासा

या वयात पुन्हा बाबा होण्याविषयी सैफने पुढे सांगितलं, “मुलांचं संगोपन करण्यासाठी माझं अगदी योग्य वय आहे. कारण जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा अनेक गोष्टींची काळजी तुम्हाला सतावत असते. करिअरचा प्रश्न असतो. आता करिअरचा प्रश्न नाही आणि मुलांना देण्यासाठी माझ्याकडे बराच वेळ आणि संयम आहे. माझ्यासाठी यापेक्षा सुंदर आयुष्य अजून काहीच असू शकत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:03 pm

Web Title: saif ali khan reveals his plans of settling down at pataudi palace with wife kareena kapoor and kids ssv 92
Next Stories
1 राजकुमार रावने ‘बुगी वुगी’साठी दिलं होतं ऑडिशन; परीक्षक म्हणाले..
2 KBC 12 : ‘या’ प्रश्नाचं उत्तर देत फूलबासन ठरल्या सर्वाधिक रक्कम जिंकणाऱ्या स्पर्धक
3 …जेव्हा पत्नीसाठी इरफान गायचा गाणं; पाहा बाबिलने शेअर केलेला ‘हा’ खास व्हिडीओ
Just Now!
X