News Flash

सैफने मुलगा जहांगीरबद्दल केलं असं वक्तव्य की कपिल शर्माला हसू झालं अनावर

सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस या तिघांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती.

saif ali khan, kapil sharma,
सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस या तिघांनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती.

‘द कपिल शर्मा शो’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अनेक सेलब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशसाठी येतात. यावेळी ‘भूत पोलिस’ या चित्रपटाची टीम म्हणजेच अभिनेता सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या शोमध्ये दिसणार आहेत. यावेळी सैफने धाकटा मुलगा जहांगीर विषयी अशी एक गोष्ट सांगितली की कपिलला हसू अनावर झाले.

‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात कपिल सैफला विचारतो की ‘लॉकडाऊनमध्ये काय केलं?’ तर सैफ उत्तर देत म्हणतो ‘पहिल्या लॉकडाऊमध्ये फ्रेंच आणि स्वयंपाक बनवायला शिकलो आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मूल.’ सैफचे हे उत्तर ऐकल्यानंतर कपिल आणि उपस्थित असलेले सगळे लोक हसू लागतात.

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

सैफ आणि करीनाचा मुलगा जहांगीरचा जन्म फैब्रुवारी महिन्यात झाला. तर जहांगीरच्या नावावरून करीना आणि सैफला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. तर लहान मुलांना नावावरून ट्रोल करण्यावर हे वाईट आहे असे करीना म्हणाली होती.

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

दरम्यान, ‘भूत पोलिस’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात सैफ अली खान, यामी गौतम, जॅकलिन फर्नांडिस आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2021 5:53 pm

Web Title: saif ali khan said such a thing about his son jahangir kapil sharma can not control and laugh alot dcp 98
Next Stories
1 Video : ‘जीने के है चार दिन’, सलमान खानचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
2 विद्युत जामवाल आणि फॅशन डिझायनर नंदिता मेहताचा ‘कमांडो स्टाईल’ साखरपुडा
3 कपिल शर्माच्या ‘या’ प्रश्नांमुळे गोविंदाची झाली बोलती बंद
Just Now!
X