News Flash

“अवॉर्ड शो फक्त पैसे कमावण्यासाठी असतात”, सैफ अली खानचे वक्तव्य

त्याने एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान नेहमी बिनधास्तपणे प्रत्येक विषयावर त्याचे मत मांडताना दिसतो. घराणेशाही या विषयावर देखील बिनधास्तपणे मत मांडणाऱ्या सैफने आता अवॉर्ड शो संदर्भात वक्तव्य केले आहे. त्याने त्याचा अवॉर्ड शोवर विश्वास नसल्याचे सांगितले आहे.

नुकताच सैफने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अवॉर्ड शो विषयी संताप व्यक्त केला आहे. ‘हम तुम चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पण अवॉर्ड शोज आणि इतर लोकांच्या मते तो त्या पातळीचा नव्हता’ असे सैफने म्हटले. गेल्या काही वर्षांमध्ये सैफने स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे आणि अनेक चांगल्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. तरी सुद्धा त्याचे अवॉर्ड शो विषयीचे मत बदललेले नाही असे त्याने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan) on

‘काही वर्षांपूर्वी एका अवॉर्ड शोमध्ये मी गेलो होतो. तिथे मला सांगण्यात आले की मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी मला कॉमिक रोलसाठी पुरस्कार देणार असल्याचे सांगितले. अवॉर्ड शोच्या याच गोष्टीमुळे मला प्रचंड राग येतो’ असे सैफ पुढे म्हणाला.

दरम्यान सैफने अवॉर्ड शो हे केवळ पैसे कमावण्यासाठी आयोजित करण्यात येतात असेही म्हटले आहे. पुढे त्याने अभिनेते हे स्टेजवर परफॉर्मन्स देतात तो देखील केवळ पैशांसाठी असे म्हटले आहे. सध्या सैफ त्याच्या या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:54 pm

Web Title: saif ali khan says award show insulted me avb 95
Next Stories
1 ‘बाबा का ढाबा’च्या मदतीसाठी सेलिब्रिटीही पुढे सरसावले
2 मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय तापसी पन्नू, शेअर केला स्विमिंग सूटमधला फोटो
3 ‘कारभारी लयभारी’! निखिल चव्हाणची नवी मालिका लवकरच
Just Now!
X