सैफ अली खानच्या आगामी ‘बाजार’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरसह ‘बडा आदमी बनना है तो लाइन क्रॉस करनी होगी’ ही टॅगलाइन विशेष चर्चेत आली. सैफ यामध्ये एका व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. ट्रेलर लाँच कार्यक्रमात देशातल्या घोटाळ्यांविषयी सैफने त्याचं मत मांडलं.

देशातल्या वाढत्या भ्रष्टाचारावर चिंता व्यक्त करत सैफने विजय मल्या, निरव मोदी आणि इतर फरार व्यावसायिकांवर, घोटाळेबाजांवर निशाणा साधला. ‘देशाला लुटून परदेशात पळून जाण्यासारखे गुन्हे भयंकर आहेत. अशा लोकांना पकडून त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे,’ असं तो म्हणाला.

वाचा : माझं नाव तनुश्री किंवा नाना पाटेकर नाही, बिग बींनी टाळलं बोलणं

केवळ पैसा कमावण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या एका स्वार्थी व्यावसायिकाची भूमिका सैफ ‘बाजार’ या चित्रपटात साकारत आहे. सैफसोबतच यामध्ये राधिका आपटे, रोहन मेहरा आणि चित्रांगदा सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.