News Flash

सैफ अली खानची ‘तांडव’ वेब सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात

सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली जात आहे.

नुकताच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित तांडव ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये सीरिजबाबत उत्सुकता पाहायाला मिळाली होती. आता ‘तांडव’ ही सीरिज प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

‘तांडव’ या सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या सीरिजद्वारे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. तसेच हिंदू देवतांचा अपमान करण्यात आला असल्याचा आरोप काहींनी केले आहे. वेब सीरिजच्या एका दृश्यामध्ये मोहम्मद झिशान अयूब नाटकात काम करताना दिसत आहे. त्याने भगवान शंकराची भूमिका साकारली आहे. दरम्यान तो नाटकामध्ये अपशब्द वापरताना दिसतो. या दृश्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

वेब सीरिजच्या निर्मात्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील सोशल मीडियावर केली जात आहे. हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफरद्वारा निर्मित ‘तांडव’ ही सीरिज ९ भागांची आहे. त्यात सैफ अली खानसोबत डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हर, तिग्मांशू धुलिया, डीनो मोरिया, कुमुद मिश्रा, गौहर खान, अमायरा दस्तूर, मोहम्मद झीशान अय्यूब, कृतिका कामरा, सारा जेन डायस, संध्या मृदुल, अनूप सोनी, हितेन तेजवानी, परेश पाहुजा आणि शोनाली नागराणी हे कलाकार आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी वेब सीरिजच्या एका दृश्यावरुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 7:09 pm

Web Title: saif ali khan tandav web series controversy avb 95
Next Stories
1 ‘मला मालिकेतून काढले नव्हते’, तारक मेहतामधील टप्पूने केला खुलासा
2 महेश मांजरेकरांच्या आगामी टॅक्सी नंबर २४ ला जयंत सांकलाचे संगीत
3 जॅकलिनच्या हॉट फोटोवर शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया, म्हणाली…
Just Now!
X