11 December 2017

News Flash

राज कपूर यांच्या नातवाचे पदार्पण सैफ अली खानाच्या चित्रपटातून

नुकतेच बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि राज कपूर यांची नात करिना कपूर यांचे

मुंबई | Updated: February 15, 2013 5:20 AM

नुकतेच बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि राज कपूर यांची नात करिना कपूर यांचे लग्न झाले. चित्रपट सृष्टीतील ही दोन मोठी घराणी एकत्र आल्यानंतर नवाब आता कपूर कुटुंबातही विशेष लक्ष घालायला लागले आहेत. जेष्ठ अभिनेते राज कपूर यांचा नातू अरमान जैन यांच्या बॉलीवूडमधील पदार्पणासाठी सैफ अली खान पुढे सरसावला आहे.
अरमान जैन हा अभिनेते रणधीर कपूर यांची बहिण रिमा जैन यांचा मुलगा आहे.
सैफ अली खानच्या इल्यूमिनाती फिल्म्स निर्मित चित्रपटाद्वारे अरमान पदार्पण करणार आहे.
इमतियाज अली याचा भाऊ आरिफ हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ही एक प्रेमकथा असेल.
चित्रपटात अरमानची नायिका कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही.

First Published on February 15, 2013 5:20 am

Web Title: saif ali khan to launch raj kapoors grandson