अभिनेता सैफ अली खाननं शुक्रवारी करोना प्रतिबंधक लसीकरणाचा पहिला डोस घेतला. फोटोग्राफर वरिंदर चावलाने त्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र नेटिझन्सना हा प्रश्न पडला की सैफचं नक्की वय काय?
तिसऱ्या टप्प्यातलं करोना प्रतिबंधक लसीकरण सध्या सुरु आहे. यात 60 वर्षांवरील व्यक्तींना ही लस देण्यात येत आहे. अशातच सैफ अली खानने ही लस घेतल्यामुळे तो सोशल मीडियामध्ये ट्रोल होऊ लागला आहे. अनेक जणांना हा प्रश्न पडला आहे की, “सैफचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक नसूनही त्याने लस कशी घेतली?”, एकाने अशीही कमेंट केली आहे की, “इतर वयोवृद्ध लोकांना अजूनही रांगेत इभं राहून वाट बघावी लागत असताना सैफला इतक्या लगेच आणि सहज लस कशी मिळाली?”, एक युजर म्हणतो, ”सैफचं वय 60+ आहे?”
काही लोकांनी त्याच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी त्याच्या लुक्सवरून त्याला ट्रोल केलं आहे. एकाने कमेंट केली आहे की, ” त्याने मास्कऐवजी तोंडाला हातरुमाल बांधलेला आहे.” एक कमेंट अशीही आहे की, “आता आपल्याला सगळ्या सेलिब्रिटीजचा वॅक्सिन टेकींग लुक पाहायला मिळेल.”
सैफने नुकतंच आपल्या ‘भूत पुलिस’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. तो सध्या आपल्या घरात आलेल्या नव्या पाहुण्याचे लाड करण्यात व्यस्त आहे. त्याची पत्नी करीना कपूर खानने नुकतंच त्यांच्या बाळाला जन्म दिला आहे.
आणखी वाचा-
सैफ अली खानने घेतला लसीचा पहिला डोस
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 6, 2021 11:55 am