News Flash

इब्राहिम कलाविश्वात येणार? सैफ म्हणतो…

सारा पाठोपाठ इब्राहिमदेखील कलाविश्वात पदार्पण करणार?

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान. आजही अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या सैफची तीनही मुलं कायमच चर्चेत असतात. यात सारा आणि तैमुर हे दोघं तर प्रसारमाध्यमे व चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असतात. मात्र, सध्या चर्चा रंगली आहे ती सैफच्या दुसऱ्या मुलाची म्हणजे इब्राहिम खानची. प्रसिद्धी व प्रकाशझोतापासून दूर राहणारा इब्राहिम कलाविश्वात पदार्पण कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे त्याने बॉलिवूडमध्ये यावं अशी सैफचीदेखील इच्छा आहे. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने ही इच्छा व्यक्त केली आहे.

“करिअरची सुरुवात करण्यासाठी कलाविश्व हा उत्तम पर्याय आहे. वयाच्या १७-१८ व्या वर्षी माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्यावेळी मला करिअरचा कोणताच मार्ग दिसत नव्हता. मात्र, माझ्या अभिनयाने मला तारलं. आज मी जे आयुष्य जगतोय ते या कलाविश्वामुळे. त्यामुळे माझ्या मुलांनी बॉलिवूडमध्येच करिअर करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे”, असं सैफ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “इब्राहिम खरं तर कलाविश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. त्यालादेखील अभिनयाची आवड आहे. पण तो कलाविश्वात नेमकं कधी पदार्पण करेल हे मी आता सांगू शकत नाही. मी इब्राहिमला कायम सांगतो की कलाविश्वात आलास तर तुला प्रचंड मेहनत करावी लागेल आणि योग्य चित्रपट निवडण्याची कसब आत्मसात करावी लागेल”.

दरम्यान, इब्राहिम कलाविश्वापासून दूर असला तरी तो काही मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकला आहे. अलिकडेच त्याने सारा अली खानसोबत एका प्रसिद्ध मासिकासाठी फोटोशूट केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 3:52 pm

Web Title: saif ali khan wants to see ibrahim ali khan in film industry ssj 93
Next Stories
1 आयुषमानचा हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, कॉपी केली शाहरुखची पोज
2 ‘विराट वडिलांच्या निधनानंतर खेळू शकतो, मग मी का नाही?’; ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली
3 नव्या भूमिकेसाठी किंग खान सज्ज; लवकरच सुरु होणार ‘या’ चित्रपटाची शुटींग
Just Now!
X