बॉलिवूडमधील सध्याचा अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून सैफ अली खान ओळखला जातो. पण फार कमी लोकांना माहिती आहे की करिअरच्या सुरुवातील सैफ अली खानला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. त्याला पहिल्याच चित्रपटामध्ये रिप्लेस करण्यात आले होते. या मागचे कारण म्हणजे सैफचे सेटवरील वागणे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी सैफचे अनप्रोशनल वागणे पाहून त्याला चित्रपटातून काढून टाकले होते.

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेखुदी’ चित्रपटात सैफ अली खानला मुख्य भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केले होते. पण या चित्रपटातून सैफला काढून टाकण्यात आले होते. त्याच्या ऐवजी अभिनेता कमल सदानला घेण्यात आले होते. एका मुलाखतीमध्ये सैफने यामागचे कारण सांगितले होते.

करीनाचं आलिशान सासर : ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो पाहिलात का?

आणखी वाचा : एकीकडे मुकेश खन्नांच्या निधनाची अफवा, तर दुसरीकडे बहिणीचा मृत्यू!

सैफने मुंबई मिररला मुलाखत दिली. त्यावेळी तो म्हणाला, ‘त्यावेळी माझ्यासाठी चेहऱ्यावर हावभाव आणणे फार कठीण होते. चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मला ते जमत नव्हते. मी प्रयत्न करूनही मला जे जमत नव्हते. बेखुदी चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवैलने केले होते. त्या चित्रपटात कजोल माझ्यासोबत दिसणार होती’ असे सैफ म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘त्या दिवशी मी चित्रपटाचे चित्रीकरण संपवून घरी परतत होतो. हा चित्रपट साइन करण्यापूर्वीच मी इंग्लंडमधून शिक्षण पूर्ण करुन आलो होतो. मी चांगल्या पद्धतीने परफॉर्म न केल्यामुळे राहुल रवैलने मला चित्रपटातून काढून टाकले. त्यांना असे वाटत होते की मला काम करण्याची इच्छा नाही.’

बेखुदी या चित्रपटात अभिनेत्री कजोला मुख्य भूमिकेत होती. तसेच तुनजा, फरीदा जलाल आणि कुलभूषण खरबंदा या कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.