02 March 2021

News Flash

VIDEO : ‘सात समुंदर पार मैं तेरे..’वर सारा थिरकते तेव्हा..

सध्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत व्यग्र असणाऱ्या साराचं हे नृत्यकौशल्य पाहता अभिनयासोबतच नृत्यावरही तिची पकड असल्याचं पाहायला मिळालं.

सारा अली खान

काही गाणी अशी असतात जी कितीही जुनी झाली तरीही त्यांची जादू मात्र प्रत्येक वेळी नवीनच राहते. अशाच गाण्यांच्या यादीतील एक उदाहरण म्हणजे ‘सात समुंदर पार…’ रिमिक्स, रिक्रिएटेड अशा विविध व्हर्जनमध्येही हे गाणं सादर करण्यात आलं. जेव्हाजेव्हा हे गाणं वाजलं तेव्हा तेव्हा अनेकांनीच त्यावर ठेका धरला. सैफ अली खानची मुलगी, सारा अली खान हिलासुद्धा हा मोह आवरता आला नाही.

सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांचे नातेसंबंध असणाऱ्या सौदामिनी मट्टूच्या रिसेप्शनमध्ये साराचा जलवा पाहता आला. यावेळी सफेद रंगाच्या साडीमध्ये साराचं सौंदर्य आणखीनच खुलून आलं होतं. रिसेप्शनसाठी अगदी साजेशा लूकमध्ये आलेल्या साराच्या चेहऱ्यावरी तेज पाहता येत्या काळात ती बॉलिवूडमध्ये बरीच प्रसिद्ध होईल असंच मत अनेकांनी मांडलं. कलाकारामध्ये असणारा तिचा वावर आणि आतापासूनच तिच्या नावाभोवती असणारं वलय पाहता ही मतं चुकीची ठरणार नाहीत असंच म्हणावं लागेल.

जया बच्चन, सोनम कपूर, करण जोहर, श्वेता नंदा यांच्या उपस्थितीतही सारा सर्वांची मनं जिंकून गेली. ‘सात समुंदर पार मैं तेरे…’ या गाण्यावर तिने ज्या नजाकतीने नृत्य सादर केलं ते पाहता रिसेप्शनमधील अनेकांनीच तिची प्रशंसा केली.
दोन महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये व्यग्र असणाऱ्या साराचं हे नृत्यकौशल्य पाहता अभिनयासोबतच नृत्यावरही तिची पकड असल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंग यांची मुलगी सारा सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या तयारीत व्यग्र आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातून ती अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर ‘केदारनाथ’ या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2018 10:36 am

Web Title: saif ali khans daughter sara ali khan dances to saat samundar paar at wedding reception watch video
Next Stories
1 स्वरा भास्करमुळे अॅमेझॉनची नाचक्की! #BoycottAmazon कॅम्पेनमुळे कंपनीला फटका
2 VIDEO : व्हॉलीबॉल खेळताय?, तर खिलाडी कुमार होऊ शकतो तुमच्या संघात सामील
3 स्त्रियांच्या शोषणाविरोधात सरसावल्या ‘स्टार प्रवाह’च्या नायिका
Just Now!
X