13 December 2019

News Flash

‘तानाजी’ चित्रपटातील लूक समोर येताच सैफ झाला ट्रोल

नेटकऱ्यांनी सैफवर मीम्सचा पाऊस पाडला आहे

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगाची चित्रपट ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील अजय देवगणचा लूक काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटातील इतर व्यक्तिरेखांवरील पडदा उचलण्यात आला आहे. अजयने शिवाजी महाराजांचा चित्रपटातील लूक प्रसिद्ध केला आहे. शरद केळकर हा मराठमोळा अभिनेता शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर शिवाजी महाराजांबरोबरच राजमाता जिजाऊंच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. पद्मावती राव या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

याव्यतिरिक्त अभिनेता सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. सैफचा उदयभान राठोड यांच्या भूमिकेतील लूक नुकताच अजयने शेअर केला आहे. पण सैफचा हा लूक चाहत्यांच्या फारसा पसंतीला उतरला नसल्याचे दिसत आहे. सैफचा चित्रपटातील लूक प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी चांगलीच फिरकी घेतली आहे. त्यांनी सैफवर मीम्सचा पाऊस पाडला आहे. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू येईल.

 

View this post on Instagram

 

#jonsnow #saifalikhan #gameofthrones #tanhajitheunsungwarrior #kitharington @kitharingtonig

A post shared by @ filmyman486 on

१५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा अजयच्या कारकिर्दीमधील १०० वा चित्रपट आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

#jonsnow #saifalikhan #gameofthrones #tanhajitheunsungwarrior #kitharington @kitharingtonig

A post shared by @ filmyman486 on

‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचे कतृत्त्व सोनेरी अक्षरात कोरले आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे होय. तानाजींच्या पराक्रमाची कथा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

First Published on November 14, 2019 6:18 pm

Web Title: saif ali khans look from tanhaji the unsung warrior reminds fans of jon snow from got avb 95
Just Now!
X