बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंहची मुलगी सारा अली खान सतत चर्चेत असते. ती आईसोबत वेळ घालवताना देखील दिसते. सारा सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो देखील शेअर करत असते. आता साराची आत्या सबा अली खानने अमृता सिंह आणि साराचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सबा अली खानने अमृता सिंह आणि साराचा एक फोटो कोलाज करुन शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघीही अतिशय सुंदर दिसत आहेत. हा फोटो शेअर करत सबाने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘दोघीही अतिशय सुंदर आहेत…’ या आशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.
View this post on Instagram
सबाने शेअर केलेल्या फोटोमध्ये साराने एक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये सारा सुंदर दिसत आहे. तर अमृता सिंहचा फोटो जुना आहे. जेव्हा अमृता चित्रपटांमध्ये काम करत होती त्या काळातील हा फोटो आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 11:01 am