News Flash

इब्राहिमचा रॉयल लूक, लग्न सोहळ्यातील नवाबी रुबाब

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नातीच्या लग्नातील फोटो

(Photo-instagram-viralbhayani)

अभिनेता सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राईम खान अद्याप तरी बॉलिवूड पासून दूर आहे. मात्र अनेकदा इब्राहिमला त्याची बहिण अभिनेत्री सारा अली खानसोबत स्पॉट केलं जातं. दोघाचे एकत्र मजा मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

इब्राहिमचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची नात सहर सिंह हिच्या लग्नातले आहेत. या लग्नाला इब्राहिम खानने हजेरी लावली होती. नवी दिल्लीत हा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. या सोहळ्यातील इब्राहिमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


लग्न सोहळ्यासाठी इब्राहिमने रॉयल लूक केल्याचं दिसतंय. त्याच्या या लूकला मोठी पसंती मिळतेय. विरल भय्यानी या सेलिब्रिटी फोटोग्राफरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नसोहळ्यातील इब्राहिमचे फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये इब्राहिम काळ्या कोटमध्ये दिसतोय. तर काही फोटोंमध्ये त्यानं मरुन कुरता घातल्याचं दिसतंय. मित्र मैत्रिणींसोबत धमाल करतानाचे इब्राहिमचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतायत.

याआधी अभिनेत्री सारा अली खानने इब्राहिमसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यात दोघांमधील बहिण-भावाचं बॉण्डींग दिसून आलं आहे. चाहत्यांनी या फोटोला मोठी पसंती दिलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 5:37 pm

Web Title: saif ali khans son ibrahim ali khan spotted panjabs cm captain amrinder singh jis grand daughters wedding kpw 89
Next Stories
1 ‘वयाच्या २५व्या वर्षी मी काही कमवत नाही’, कल होना होमधील झनकचा खुलासा
2 जान्हवीच्या डान्सचा जलवा, पहिल्याच आयटम साँगवर चाहते घायाळ
3 नेटफ्लिक्सची मेजवानी, या वर्षात घेऊन येणार 41हूनही अधिक नवे चित्रपट आणि शोज
Just Now!
X