नुकतंच सोशल मीडियावर सायना या चित्रपटाचं पोस्टर आणि टीझरही प्रदर्शित झालं आहे. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाच्या टीझरचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी मात्र या पोस्टरला ट्रोल केलं आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी या ट्रोलिंगवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

परिणीती चोप्राची प्रमुख भूमिका असलेल्या सायना ह्या चित्रपटाचं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं. काही जण म्हणत आहेत की, बॅडमिंटन हा खेळ खालून खेळला जातो. सर्विससुद्धा खालून करतात. या चित्रपटाच्या टीमने टेनिसच्या चाहत्याकडून हे पोस्टर बनवून घेतलं आहे. त्यामुळे हे झालं असावं. यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी खुलासा करत खंत व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात ते म्हणतात, “पोस्टरवर डिजीटल मीडियावरून बऱ्याच प्रकारच्या चर्चा होत आहेत. सगळं टेनिससारखं वाटत आहे…सायना सानिया बनली आहे वगैरे…”

“जर सायना ते वर उडणारं शटल आहे तर हे सरळ आहे की राष्ट्रध्वजातले रंग असलेला तो रिस्टबँड बांधलेल्या त्या मुलीचा हात म्हणजे सायना आज ज्या उंचीवर आहे तिथपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदा यांनी उत्तम संकल्पनेतून हे पोस्टर तयार केलं पण दुर्दैवाची गोष्ट ही की, घाईघाईत प्रतिक्रिया देणाऱ्या या जगाला एवढ्या सविस्तरपणे समजावून सांगावं लागत आहे. काहीही बोलण्यापूर्वी विचार का करत नाही…विचार करा.”

सायना नेहवालच्या आयुष्यावर येणाऱ्या या चित्रपटात परिणीती चोप्रा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र करोनाच्या संकटामुळे याचं प्रदर्शन लांबणीवर पडलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केलं असून निर्मिती भूषण कुमार यांची आहे.

आणखी वाचा-

‘सायना’चा टीझर रिलीज, चाहत्यांची उत्सुकता ताणली

https://loksatta.com/manoranjan-news/pareeniti-chopra-shares-teaser-of-her-upcoming-movie-saina-kpw-89-2413665/  

‘सानिया मिर्झावर बायोपिक आहे की सायना नेहवालवर?’, ‘सायना’च्या पोस्टरवरुन परिणीती झाली ट्रोल

https://loksatta.com/manoranjan-news/parineeti-chopra-gets-trolled-owing-of-saina-poster-avb-95-2412703/